माय मुळशी
Trending

हिंजवडीच्या सरपंचपदी अखेर विशाल साखरे विराजमान, बहुमताने झाली निवड, गावात आनंदोत्सव

हिंजवडीतील 17 पैकी 16 सदस्यांना केले मतदान एक सदस्य राहिला अनुपस्थित

महावार्ता न्यूज ः महाराष्ट्राची माहिती तंत्रज्ञान नगरी हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विशाल लक्ष्मण साखरे यांची 16 विरूध्द 1 अशी बहुमताने आज निवड करण्यात आली.
8 नोव्हेंबर रोजी हिंजवडीतील नव्या ग्रामपंचायतीमधील तिसर्‍या सरपंच पदाची निवड प्रक्रिया करण्यात आली. सरपंच पदासाठी मयूर साखरे, विशाल साखरे व शिवनाथ जांभुळकर यांनी अर्ज भरले होते. विहित मुदतीत कोणीच माघार न घेतल्याने निवडणुक घेण्यात आली. हिंजवडीतील 17 पैकी 16 सदस्यांना मतदान केले. एक सदस्य मतदान प्रक्रियेत उपस्थित राहिला नाही.
मतमोजणीत विशाल साखरे यांना 15 तर मयूर साखरे यांना 1 मत मिळाले. शिवनाथ जांभुळकर यांना शून्य मतदान झाले. विशाल साखरे यांची बहुमताने हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड करण्यात आली. सुहास कांबळे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजणे हे सह निवडणुक अधिकारी होते.
अपेक्षेप्रमाणे सरपंचपदी विशाल साखरे यांची निवड होताच हिंजवडीत जल्लोष करण्यात आला.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close