माय मुळशी
Trending
मुळशीत संग्राम थोपटेंच्या वाढदिवसानिमित्त ॲड. शिवाजी जांभुळकरांच्या वतीने सेवाभावी उपक्रम

महावार्ता न्यूज: भोर , वेल्हा , मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ॲड. शिवाजीर जांभुळकर ( उपाध्यक्ष – पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी ) यांच्या वतीने मुळशी तालुक्यांतील भुगाव येथील अनिकेत सेवाभावी संस्था ( मतिमंद मुले – मुलीची निवासी शाळा ) येथे रवा १०० किलो , तांदुळ १०० किलो , जेमिनी तेल १५ किलो डबा , बिस्कीट अशी वस्तुरूपी मदत करण्यात आली
यावेळी संस्थेचे संस्थापक कल्पना वरपे , व्यवस्थापक गणेश तनपुरे , पुणे जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष संजय उभे , मा. उपसरपंच राहुल जांभुळकर , मुळशी काँग्रेसचे खजिनदार अविनाश शिंदे , मुळशी काँग्रेस ग्राहक संरक्षण चे अध्यक्ष कैलास चौंधे , महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस चे उपाध्यक्ष कुमार शेडगे , शंकर जांभुळकर , भोर विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष राहुल जाधव , संजय जांभुळकर , अमित जांभुळकर , राकेश कांबळे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
Share