पुणे
Trending

मुळशीत पीएमआरडीएचा कोण विजयी शिलेदार, काँग्रेस आय की राष्ट्रवादीचा, शुक्रवारी 11 पर्यंत निकाल हाती येणार

महावार्ता न्यूज ः मुळशीत 100 टक्के मतदान झाल्याने पुणे महानगर नियोजन समिती – पीएमआरडीएची निवडणुकीची निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण मतदार संघातून 7 उमेदवार निवडून येणार असून यातील मुळशीत झेंडा काँग्रेस आय की राष्ट्रवादीचा याची चर्चा रंगली आहे. शुक्रवारी 12 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यलयात सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून सकाळी 11 पर्यंत निकालाचा कौल स्पष्ट होणार आहे.
पीएमआरडीएच्या 7 जागा जिल्हातील 579 मतदार बुधवारी मतदान झाले. यात पीएमआरडीए हद्दीतील सर्व सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती मतदांना हक्क बजावले. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, शिरूर, दौंड, पुरंदर, खेड, भोर, वेल्हा व हवेली तालुक्यातील सरपंच पसंतीनुसार 21 पैकी 7 उमेदवरांना मतदान केले.

पीएमआरडीएच्या (पुणे महानगर नियोजन समिती) ७ जांगासाठी होत असलेल्या निवडणूकीसाठी होत असलेल्या मतदानात मोठी चुरस निर्माण झालेली होती तथापि या निवडणूकीत १००% मतदान झाले असून तालुक्यातील ९० पैकी ९० सरपंच मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.     मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून काँग्रेसनेही मोठे आव्हान उभे केले असल्याचे चिञ मतदानावेळी पाहायला मिळाले. शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे उमेदवारही निवडणूकीत यश मिळावे म्हणून प्रयत्न करताना दिसत होते.माञ मतदान सुरू असताना महाविकास आघाडीचे तालुक्यातील नेते एकञ येऊन बसले असल्याचे चिञ पाहायला मिळाले.
मुळशीतून निकिता रमेश सणस -भूगांव, सुखदेव तापकीर – मुलखेड, मींनाथ कानगुडे – वेगरे, सुरेखा तोेंडे – खेचरे हे चार सरपंच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुळशीत राष्ट्रवादीची ताकद जास्त असली तरी एकूण मतांच्या समीकरणात काँग्रेसच्या निकिता सणस बाजी मारतील असा विश्वास जाणकरानां आहे. मुळशीतून पहिल्या पसंतीची 40 पेक्षा अधिक, तर दुसर्‍या पसंतीची 30 पेक्षा अधिक मते निकिता सणस यांना मिळण्याची शक्यता आहे.
मतदान करणार्‍या 9 तालुक्यापैकी 5 तालुक्यात काँग्रस आयचे आमदार असल्याने व केवळ तीनच जागा लढवित असल्याने पसंतीक्रमानुसार काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून येतील असा अंदाज आहे. 579 मतदांनापैकी मुळशी, भोर, व वेल्ह्यातील सर्व गावांचा समावेश असल्याने याचा फायदाही काँग्रेसच्या उमेदवरांना होण्याची शक्यता आहे. पुरंदर तालुक्यातही काँग्रेसचा आमदार असल्याने त्याचा थेट फायदा मुळशीच्या काँग्रेसच्या उमेदवाराला होणार आहे. यामध्ये निकिता सणस यांना भोर, वेल्हा व पुरंदरमधून सर्वाधिक दोन क्रमांकाची मते प्राप्त होणार आहेत. तसेच मावळ व दौंडमधूनही वैयक्तिक संपर्कातून सणस यांनी क्रमांक 1 चे मतदान खेचून आणल्याची चर्चा जिल्हात सुरू आहे.
पुणे शहरात भाजप व राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार आहे. मात्र 7 जागांसाठी 21 उमेदवार असणार्‍या ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचा धक्कातंत्राचा करिश्मा 10 नोव्हेंबरला मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहाण्यास मिळणार आहे.

पुणे महानगर नियोजन समिती – पीएमआरडीए निवडणुक 2021
मतदानाची संपूर्ण आकडेवारी

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close