
महावार्ता न्यूज ः काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातही उमेदवरांनी पुणे महानगर नियोजन समिती – पीएमआरडीए ग्रामीण मतदार संघात मुसंडी मारली असून मुळशीत पहिल्या पसंतीची 58 मते असणारे सुखदेव तापकीर आघाडीवर आहेत.
जिल्हाधिकारी कार्यलयात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर होते. वेल्हाच्या मांगदरी गावच्या राष्ट्रवादीच्या सरपंच प्रियांका पठारे या पहिल्या पसंतीची सर्वाधिक 74 मत मिळाल्याने विजयी झाल्या आहेत.
मुळशीतूनही राष्ट्रवादी कॉग्रेसचे मुलखेडचे सरपंच सुखदेव तापकीर 58 मतांनी आघाडीवर आहेत. भूगांवच्या निकिता सणस यांना पहिल्या पसंतीची 22 मते मिळाली आहेत. मताचीं आघाडी पहाता सुखदेव तापकीर यांच्यासह राष्ट्रवादीचे सातही उमेदवार निवडून येण्याच्या मार्गावर आहेत.
मतमोजणीतील पहिल्या पसंतीच्या फेरीत 4 उमेदवारांना शून्य मते मिळाली आहेत.
Share