पुणे
Trending

मुळशीत पेरिविंकलमध्ये बालदिनानिमित्त रंगल्या विविध स्पर्धा, शिक्षकांच्या नाट्यकलेचे पालकांकडून कौतुक

संस्थापक राजेंद्र बांदल यांच्या कार्यप्रणालीमुळे मुळशीत होतयं पेरिविंकलची प्रशंसा

महावार्ता न्यूज:  चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल च्या बावधान, सूस ,पिरंगुट व पौड या सर्वच शाखांमध्ये बालदिन सळसळत्या उत्साहात साजरा झाला.
 दिवाळीच्या १० दिवसांच्या सुट्टी नंतर पहिलाच  दिवशी हा बालदिनाचा कार्यक्रम विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या कार्यकुशल व्यवस्थापन समिती सदस्यांनी शाखानिहाय आपली उपस्थितीने संबंधीत शाखेतील सर्व शिक्षकांना वेगळी उर्जा दिसून आली.
पेरिविंकलच्या बावधन शाखेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, रुचिरा खानविलकर आणि शिक्षक वृंद उपस्थित होत्या. बावधन शाखेच्या शिक्षिकांनी खास विद्यार्थ्यांसाठी एक नाटिका बसवून ती सादर केली. गाणी, मनोरंजक खेळाचे प्रकार विद्यार्थ्यांसाठी बसवले गेले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करून करण्यात आली

पिरंगुट आणि पौड शाखेत पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता आठवी आणि नववीच्या ७ विद्यार्थ्यांनी बालदिनाप्रीत्यर्थ आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक वृन्दापैकी भारती पाटील यांनी नादमधुर गाणे विद्यार्थ्यांसाठी सादर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद आणि नादमय धक्का दिला. मुख्याध्यापक अभिजित टकले सरांनी बालदिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील आधुनिक विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धत आणि वद्यार्थी वर्गावरील वाढती व त्याहीपेक्षा बदलती जबाबदारी अधोरेखित केली.इयत्ता ५वी ते ७वी च्या बालदोस्तांसाठी विशेष खेळ आयोजित केले गेले. चमचा लिंबू, लगोरी, पोटॅटो रेस, टॅटू, रिंग अँड टॉस, पिरॅमिड, बलून गेम, संगीत खुर्ची असे विविध खेळ आयोजित केले होते. याला सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुस शाखेतही आजचा हा कार्यक्रम जल्लोषत  साजरा झाला.सरस्वती पूजन व पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांनी सर्व विद्यार्थ्याना सदाफुली सारखे सदैव फुलत राहून सर्वांना प्रसन्न करता यावे असे व्यक्तिमत्व असावे असे सांगून बालदिनावर एक कविता सादर केली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यास उत्सुकता असलेल्या जादूच्या प्रयोगाचा एक प्रयोग जादूगार बोलाऊन बालदीनानिमित्त सादर केला. 1ली ते 4थी च्या विद्यार्थ्यांना देखील लिंक शेअर करून झूम वरून या जादूच्या प्रयोगाचा आस्वाद घेतला. संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांस बालदिनाच्या शुभेच्छा देऊन एक हिंदी कविता सादर केली. त्यानंतर मुलांसाठी खोखो संगीत खुर्ची, आंधळी कोशिंबीर असे विविध प्रकारचे खेळ आयोजित केले होते. विद्यर्थ्यँनि देखील उस्फुर्त पणे काही गीत सादर केले.शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित , माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी, सर्व शिक्षक वर्ग आजच्या या आयोजनात सहभागी होते. संचालिका रेखा बांदल स्वत: जातीने या शाखेत उपस्थित होत्या. बालदिनाच्या निमित्ताने आपल्या सर्व बालदोस्तांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापिका रुचीरा खानविलकर, सौ निर्मल पंडित व अभिजित टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यविक्षिका सौ रश्मी पाथरकर, सूस शाखेच्या पर्यवेक्षिका सौ शुभा कुलकर्णी व सौ भक्ती माने तर पिरंगुट शाखेच्या माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे तर पौड शाखेच्या जिनी नायर यांच्या सहकार्याने व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने कोविड विषयक सर्व नियम पाळून हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा झाला. रांगोळी रेखाटन, फलक लेखन, सजावट या कामात सर्वांनीच हातभार लावला. कोविड महामारीच्या नंतर आता हळूहळू पण सर्व सुरळीत सुरुहोण्याच्या या टप्प्यावर आजचा हा कार्यक्रम साजरा करण्यामधून पेरीविंकलच्या सेकेंड टर्मच्या सुरवातीलाच उत्साहात विद्यार्थ्यांचे आगमन झाले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close