खेळ खेळाडू
Trending

नियोजित दौरा सोडून नामदेव शिरगांवकर धावले खेळाडूंच्या मदतीला, छत्रपती पुरस्कार खेळाडूंचे उपोषण मागे

महावार्ता न्यूज ः भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगांवकर सोमवारी सकाळी नगरकडे नियोजित दौर्‍यासाठी निघाले होते. वाटेत पुण्यात उपोषणाला असलेल्या छत्रपती विजेत्या खेळाडूंची त्यांनी भेट घेतली व आपल्या कार्यतत्परतेने सात दिवस सुरू असलेल्या उपोषण करीत असलेल्या खेळाडूंना तातडीने क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत तासभरात न्याय मिळवून दिला.
शिवछत्रपती विजेत्यांना शासकीय नोकरीत समाविष्ठ करण्यासठी गेली 6 दिवस म्हाळुगे स्टेडियमबाहेर 4 खेळाडू उपोषणाला बसले होते. अखेर सातव्या दिवशी नामदेव शिरगांवकर यांनी आपला नियोजित दौरा लांबणीकर टाकत खेळाडूंची अस्थेने चौकशी करीत आयुक्तांची येण्याची विनंती केली. उपसंचालक सुहास पाटील यांनी आयुक्तांना बोलवून खेळाडूंना शासकीय नोकरीबाबत आश्वासन दिले. मंत्रालयात बैठक आयोजित करून खेळाडूंच्या नोकरीबाबात चर्चा केली जाईल असे क्रीडा सचिवांकडून आश्वासन मिळाल्यानंतर ओमप्रकाश बकोरिया व नामदेव शिरगांवकर यांच्या हस्ते नारळपाणी पिऊन उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी शारीरिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा विश्वनाथ पाटोळे, क्रीडालेखक, ऑलिम्पिक पत्रकार संजय दुधाणे, ऑलिम्पिक संघटनेचे राजेंद्र घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी क्रीडालेखक संजय दुधाणे यांनी नगरविकास मंत्रालया अंतर्गत महानगरपालिका, पालिका, नगर पंचायत यामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांनासाठी राखीव जागा ठेवल्या पाहिजे हा मुद्दा मांडला. याबाबतही बैठकीत चर्चा केली जाईल असे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.
104 शिवछत्रपती विजेत्या खेळाडुं शासकीय नोकरी मिळण्याबाबत उपोषण सुरू करण्यात आले. यामध्ये कोरोना नियमाचे पालन करीत विकास काळे-कब्बडी,  सागर गुलाने-अट्यापाट्या
ललित फुलकर-अट्यापाट्या, स्नेहा ढेपे- तलवारबाजी,  प्रिताली शिंदे-सायकलिंग
श्रीमती गंगा शिंदे अट्यापाट्या हे  खेळाडू उपोषणसला बसले होते.

 

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close