
महावार्ता न्यूज: पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाच्या “उपाध्यक्ष “पदी आयटीनगरी माणगावचे प्रसिध्द मल्ल मुळशीतील नामांकित पैलवान संदीप श्रीरंग पारखी यांची निवड करण्यात आली.
कुस्तीगिर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पै संदीप भोंडवे यांनी पारखी यांना निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी जिल्हा कुस्तीगिर संघाचे सचिव प्रा. किसन बुचडे,संघाचे खजिनदार महाराष्ट्र चॅम्पियन वस्ताद पांडुरंग खानेकर, सह्याद्री कुस्ती संकुलाचे अध्यक्ष विजय बराटे, उपमहाराष्ट्र् केसरी संतोष गरुड,मुळशी तालुका अध्यक्ष शिवाजी तांगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
माण ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य प्रदीपबापू पारखी यांचे ते मोठे बंधू आहेत. लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्यानें संदीप यांनी अनेक गावातील यात्रेमध्ये होणाऱ्या कुस्ती आखाड्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. 2018 मध्ये माण गावात भव्य तालुकास्तरीय निवड चाचणी स्पर्धा आयोजीत करून त्यांनी तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी अनेक ठिकाणी तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करत कुस्तीक्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.
संदीप पारखी यांच्या निवडीचे संपूर्ण जिल्ह्यासह पंचक्रोशीत जोरदार स्वागत होत असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कुस्तीची परंपरा लाभलेल्या मुळशी तालुक्यातील नवोदित मल्लाना घडविण्यासाठी परिश्रम घेणार असून मुळशी तालुका जिल्हा संघाचा नावलौकिक वाढविण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार आहे .
पै. संदीप पारखी – (नवनिर्वाचित उपाध्यक्ष -पुणे जिल्हा कुस्तीगिर संघ)
Share