पुणे
Trending
मुळशीची सुवर्णकन्या वैष्णवी मांडेकरच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांच्या वसतीगृहात किराणा साहित्याचे वाटप
विद्यार्थ्यांसाठी त्यांचे आई वडील हेच खरे प्रेरणास्थान : गंगाराम मातेरे

महावार्ता न्यूज : मुळशीची सुवर्ण कन्या व आंतरराष्ट्रीय क्रीडा पटू वैष्णवी मांडेकरने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.वैष्णवीने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वामी विवेकानंद विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच शिळेश्वर येथील मुलामुलींच्या वसती गृहास आवश्यक असलेले किराणा साहित्य भेट दिले.

यावेळी बोलताना गंगाराम मातेरे म्हणाले की, दादाराम मांडेकर यांचे कुटुंब हे तालुक्यातील एक आदर्श कुटुंब असून वैष्णवी सारखी गुणी खेळाडू तिच्या आई व वडिलांच्या योग्य मार्गदर्शमुळे घडू शकली आहे. कोणत्याही मुलाच्या जडणघडणीत त्याचे आईवडील हीच खरी प्रेरणा असतात.
यावेळी माधवी बाखरे यांनी प्रास्ताविक केले तर वैष्णवीचे पालक दादाराम मांडेकर,सामाजिक कार्यकर्ते संजय भरम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चांदेचे सरपंच अशोक ओव्हाळ, युवक काँग्रेसचे प्रसाद खानेकर,संदीप केदारी, संदीप हुलावळे, संजय भरम, प्रवीण भरम,शंकर भरम, प्रमोद मांडेकर तसेच शाळा प्रकल्प प्रमुख माधवी बाखरे, मुख्याध्यापक सतीश शिंदे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप पाटील शिक्षक वर्ग व अन्य मान्यवर उपस्थित होते.
वैष्णवीने स्वामी विवेकानंदांच्या विचाराचे दाखले देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला .शालेय प्रकल्प प्रमुख माधवीताई बाखरे यांनी संस्था कार्याचा परिचय दिला . मुळशी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक सतीश शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले..
Share