
महावार्ता न्यूज : मुळशीत अवैध बांधकामाविरुद्ध पीएमआरडीएने कारवाईचा मोहीम सुरू असून भूगावमध्ये 14600 चौ. फुट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली.
26 नोव्हेंबर रोजी मौजे भुगाव ता. मुळशी येथील सर्वे नं. 29/2 मधील रस्तावरील रहिवास व वाणिज्य प्रयोजनाकरिता बांधलेली RCC बांधकामाच्या 6400 चौ.फुटाची आणि गट नं 513 मधील अनधिकृत मंगल कार्यालयावर 8200 चौ. फुट अशी एकूण अंदाजित 14600 चौ. फुटाची अवैध बांधकामावर पोकलेनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. सदर बांधकाम निष्कसनाच्या वेळी PMRDA चे अधिकारी ,कर्मचारी स्थानिक पोलीस स्टेशन कडील पोलीस कर्मचारी उपस्थित होते
अवैध बांधकामाविरुद्धच्या कारवाईची मोहीम अशीच सुरू राहणार असून यापुढे कोणीही विनापरवाना रहिवास वाणिज्यिक अथवा औद्योगिक वापरा करिता बांधकाम करू नये असे जाहीर आवाहन PMRDA कडून करण्यात आले.
Share