क्राइम
Trending
मुळशीत हुंडाबळी, नांदे गावात विवाहितेची आत्महत्या, पती, सासू, सासरे व नणंदवर गुन्हा दाखल

महावार्ता न्यूज : माहेरकडुन टीव्ही ,सोफा, फ्रिज, ओव्हन, वॉशिंग मशिन घेवुन असे म्हणुन मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून नांदे गावातील सौ.रोहिणी उर्फ रोमा तेजस मरकड वय-22 हिने गळफास लावून आत्महत्या केली असून पौड पोलीसांनी तिचे पती, सासू, सासरे व नणंद अश्या 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मृत झालेल्या महिलेचे वडिल जर्नादन रामचंद्र साठे वय-43, राहणार हिरासनगर,पिरंगुट यांनी तक्रार केल्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर पोस्टमार्टेम करण्यात आले आहे.
आरोपी – 1) अशोक एकनाथ मरकड ,2) सौ.विजया अशोक मरकड, 3) तेजस अशोक मकरड सर्व रा.नांदे,ता.मुळशी, जि.पुणे, 4) नणंद-किर्ती केशव चेमटे रा.तळेगाव दाभाडे,ता.मावळ,जि.पुणे
मे 2021 महिन्यात लग्न झाल्यापासून फिर्यादी यांची मुलगी सौ.रोहिणी उर्फ रोमा तेजस मरकड वय-22 वर्ष आरोपींनी संगनमत करून तिला शुल्लक कारणावरून हाताने मारहाण करून शिवीगाळ करुन, घालुन पाडुन बोलुन, तु तुझे माहेरकडुन टीव्ही ,सोफा, फ्रिज, ओव्हन, वॉशिंग मशिन घेवुन ये असे म्हणुन मानसिक व शारिरीक छळ केला. अखेर छळाला कंटाळून महिलेने 28 नोव्हेंबरला रात्री पावणेएक वाजता आत्महत्या केली.
घटनेचा तपास पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनव्दारे पीएसआय शिंदे करीत आहेत.
Share