क्राइम
Trending

मुळशीत विद्यमान उपसरपंचचा ट्रकच्या डाव्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू, ओव्हरटेकच्या नादात हायवाने घेतला बळी

कोळवली, ता.मुळशी गावचे विद्यमान उपसरपंच असलेले ज्ञानेश्वर विठ्ठल सुतार (वय ४७) यांचा  ओव्हरटेकच्या नादात हायवा  घाईत पुढे जात असताना ट्रकने गाडीला धडक बसून हायवाच्या डाव्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.  पत्नीसोबत कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी चालेलेल्या सुतार यांचा घोटवडे फाटा ते हिंजवडी रस्त्यावर भरे पुलाजवळबळी गेला
        कोळवली, ता.मुळशी गावचे विद्यमान उपसरपंच असलेले ज्ञानेश्वर विठ्ठल सुतार (वय ४७) हे अपघातात जागेवर मृत्युमुखी पडले. त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी नीता ज्ञानेश्वर सुतार (वय अंदाजे ४१) या सुदैवाने अपघातातून बचावल्या. त्यांना घोटवडे फाटा येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर सुतार आणि त्यांच्या पत्नी नीता या त्यांची दुचाकी (क्र.एम एच १२ सीजी २८३१) टिव्हीएस व्हिक्टर वरून घोटवडे येथे चालले होते. घोटवडेत त्यांना वॅक्सिन घेऊन तिथे राहत असलेल्या त्यांच्या बहिणीला भेटायचे होते. मात्र भरे पुलाजवळ समोरून आलेल्या अवजड हायवा ट्रक (एम एच १४, एच यु ००४३) ला धडक बसली. अंगावरून हायवा ट्रकचे चाक गेल्याने ज्ञानेश्वर यांचा जागेवरच मृत्यू झाला. नीता या बाजूला फेकल्या गेल्याने अपघातातून त्या बचावल्या आहेत.

घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पौड पोलीस चौकीला नवनिर्वाचित पीएमआरडीए सदस्य सरपंच सुखदेव तापकीर व कुंभेरी-कोळवली गावचे ग्रामस्थं जमले होते. याबाबत प्रतिक ज्ञानेश्वर सुतार (वय १९, रा. कुंभेरी, कोळवली, ता.मुळशी) याने फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावते हे तपास करत आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close