
महावार्ता न्यूज: मुळशीतील पिरंगुट बाजारपेठेत 7 वर्षापूर्वी झालेल्या निलेश चंद्रकांत कांबळे याचा खूनातील आरोपी एकनाथ तुकाराम सुतारला न्यायालयाने जन्मठेपेची व ५ हजार रू दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पौड पोलीस स्टेशन गु.र.न. २६९/ २०१४, भा.द.वि.कलम ३०२, मधील फिर्यादी नामे
अमोल सुभाष मानकर, वय २८ वर्षे, रा.लक्ष्मीनगर पिरंगुट ता.मुळशी, जि.पुणे यांनी फिर्याद दिली
होती की, दिनांक १४/१२/२०१४ रोजी फिर्यादी व मयत नामे निलेश चंद्रकांत कांबळे, वय २१
वर्षे, रा.सदर हे पिरंगुट येथील आठवडे बाजारामध्ये भांडे विकी व्यवसाय करत होते.
मयत निलेश कांबळे व आरोपी एकनाथ तुकाराम सुतार वय २८ वर्षे, रा.निकटेवस्ती पिंरगुट ता.मुळशी, जि.पुणे यांच्यात एक दिवस अगोदर पिरंगुट कॅम्प येथील मोबाईल दुकानाच्यासमोर बाचाबाची झाली होती. त्यावेळी आरोपीने मयतास बघुन घेईल अशी धमकी दिलेली होती.
त्यानंतर मयत व फिर्यादी तसेच
मयताचा चुलता बंडु काबंळे यांनी आठवडे बाजारात त्यांचे दुकान लावले असता दुपारी आरोपीने मयताचे जवळ येवुन त्याचे जवळील सुऱ्याने मयताचे छातीवर, मानेवर गंभीर वार करून त्याचा खन केला. याप्रमाणे पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन तपासी अंमलदार सपोनि नंदु गायकवाड यांनी पोलीस
स्टाफचे मदतीने करून आरोपी नामे एकनाथ तुकाराम सुतार वय २८ रा.निकटेवस्ती पिंरगुट ता.मुळशी जि.पुणे याचे विरोधात मा.हुजुर न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
मा.श्री.जी.पी.अग्रवाल सो सेशन कोर्ट, शिवाजीनगर,पुणे यांनी सदर केस चालवुन सदर
गुन्हयातील साक्षीदार, मेडिकल अधिकारी, जप्त मुदेमालाचा सी.ए अहवाल, इत्यादी पुरावे पडताळुन त्यापैकी प्रत्यक्ष २ साक्षीदार, वैदयकिय अधिकारी व पंच साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली.
सरकारतर्फे मा.श्री सुनिल मोरे सरकारी अभियोक्ता, पुणे यांनी केलेला युक्तीवाद व बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकून सरकार पक्षाचा युक्तीवाद व पुरावे ग्राहय धरून मा.श्री.जी.पी.अग्रवाल सो सेशन कोर्ट
शिवाजीनगर, पुणे यांनी दिनाक १९/१२/२०२१ रोजी आरोपी नामे एकनाथ तुकाराम सुतार वय २८ रा.निकटेवस्ती पिंरगुट, ता.मुळशी, जि.पुणे यांस जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रू दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्हयांचे केस अधिकारी अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक यांनी साक्षीदारांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले तसेच त्यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार नंदु गायकवाड सपोनि, व पोलीस स्टाफ तसेच कोर्ट कारकुन सहायक फौजदार बी.बी.कदम व पोहवा चौधरी, तसेच पो.हवा. तळपे व पो.कॉ साळुंके यांनी साक्षीदारांना वेळेत समन्स बजावणी करून केसचा पाठपुरावा करून सदर निकालाचे अनुषंगाने उल्लेखनीय असे काम केलेले आहे.
Share