
महावार्ता न्यूज: मुळशी तालुक्यातील लवळे येथील श्री.संत सावता महाराज विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळाले आहे. उद्योजक नाथा राऊत, सरपंच निलेश गावडे तसेच मा.सरपंच संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनी दाखविलेले सामंजस्य ऐक्य व सहकार्याने हि निवडणूक बिनविरोध झाली. एकूण १३ जणांचे संचालक मंडळ आहे. १२ संचालकांची बिनविरोध निवडणूक झाली असून १ जागा रिक्त आहे. बिनविरोध निवडून देण्यासाठी मा.सरपंच नांदे प्रशांत रानवडे ,उपसरपंच रंजित राऊत, श्री.पोपट सातव, श्री. प्रल्हाद सातव ,श्री.सुदाम राऊत सर, श्री. सोमनाथ कळमकर सर , श्री.बाळासाहेब सातव, श्री. ऋषिकेश राऊत, श्री.तानाजी आल्हाट, श्री.ज्ञानेश्वर राऊत, श्री.प्रसाद शितोळे, श्री.गणेश शितोळे, श्री.दशरथ गावडे, श्री.सुनील सातव सर, आदींनी प्रयत्न केले.निवडी नंतर नवनिर्वाचित संचालकांनी शेतक-यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प केला.
संचालक मंडळ पुढील प्रमाणे, बाणेकर विठ्ठल बाबुराव , सातव सागर ज्ञानेश्वर , कळमकर बाळू विठोबा , राऊत रंगनाथ महादू , कुदळे राजेंद्र महादेव , शितोळे गजानन बाबुराव ,भोसले चंद्रकांत लक्ष्मण , सातव बाळासाहेब सखाराम , रानवडे मंगल संतोष , सातव वैशाली श्रीधर , केदारी उत्तम बळवंत ,राऊत सुरेश शंकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Share