माय मुळशी
Trending
पौड पोलीस स्टेशनचे अशोक धुमाळ, देवकर, शिंदेसह 9 जणांना सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार

महावार्ता न्यूज: सप्टेंबर 2021 मध्ये गुन्हे उखल करण्यात मुळशीतील पौड पोलीस स्टेशनच्या यशाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सपोनि भालचंद्र शिंदे, विनायक देवकर यांच्यासह 9 जणांना सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पौड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २४३/२०२१ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे दाखल गुन्ह्याची चांगल्याप्रकारे उखल केल्याबद्दल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या हस्ते गुन्हे आढावा बैठकीमध्ये प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.
सन्मानित करण्यात आलेले मुळशीतील पोलिस दल पुढील प्रमाणे
१) श्री. अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक
२) श्री. भालचंद्र शिंदे, सपोनि
३) श्री. विनायक देवकर, सपोनि
४) श्री. श्रीकांत जाधव, पोउनि
५) श्री. पो.हवा 320/ संदीप सपकाळ
६) श्री. पो.ना 505/ राॅकी देवकाते
७) श्री. पो. ना. 2450 सिद्धेश पाटील
८) श्री.पो. अंम. 2417 राजेश गायकवाड
९) श्री. पो. अंम. 1871 साहिल शेख
मुळशीतील या कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मुळशीत कौतुक होत आहे.
Share