
महावार्ता न्यूज: मुळशीतील भुकूम व खांबोली गावात 2 दिवस बिबट्याचा वावर असूनही तहसील कार्यालयाकडून सूचना दिल्यानंतरही वन विभागने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. वनविभाग पिंजरा बसवणे दूरच ग्रामस्थांच्या सुरक्षेबाबत उदासीन आहे. केवळ परिसरात जनावरापासून सावधान अशी जागृती वनविभाग करणार आहे.
मुळशीत भुकूम व खांबोली गावाच्या गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी 15 डिसेंबरला रात्री रोहिदास खेंगरे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला होता. यात वासराचा मृत्यू झाला. गुरुवारी 16 डिसेंबरलाही रात्रीही रस्त्यावर बिबटे भर रस्त्यात उतरला होता. तरीही मुळशी वन विभागाने तातडीची अंमलबजावणी केली नाही.
रिहे खोऱ्यातील वनविभागाच्या केंदे मॅडम महावार्ताशी बोलताना म्हणाल्या की, बिबट्याचा शोध घेण्यासाठी कॅमेरे लावले आहेत. पिंजरा लावण्यासाठी नागपूरच्या मुख्य कार्यालयाची आधी परवानगी घ्यावी लागते. तशी यंत्रणा मुळशीत नाही. सध्या बिबट्यापासून दूर सुरक्षित रहावे अशी जागृती आम्ही करीत आहोत.
वन विभाग अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचा जीव गमविण्यापूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी लवकरात लवकर पिंजरे लावण्यात यावा अशी मागणी काॅग्रेसचे केशव पडळघरे यांनी केली आहे.
बिबट्याचा व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
https://youtube.com/shorts/exmUVKqaemU?feature=share
Share