पुणे
Trending

उजवी भुसारी काॅलनी येथील ॐ दत्त श्री ठाकूर महाराज पथ च्या नामफलकाचे उद्घाटन, नगरसेविका सौ.अल्पना गणेश वरपे यांच्या संकल्पना

महावार्ता न्यूज: नगरसेविका सौ.अल्पना गणेश वरपे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र.१० कोथरूड डेपो-बावधन मधील सौदामिनी सोसायटीजवळील ॐ दत्त मंदिर,उजवी भुसारी काॅलनी येथील ॐ दत्त श्री ठाकूर महाराज पथ च्या नामफलकाचे उद्घाटन खडकवासला मतदार संघाचे कार्यक्षम आमदार भिमरावआण्ण तापकीर यांच्या हस्ते सन्माननिय मामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
अध्यात्म क्षेत्रात प्रचंड काम असणारे व निस्सिम दत्तभक्त व ॐ दत्त मंदिराचे संस्थापक श्री.ठाकूर महाराजांचे नामकरणाचा कार्यक्रम श्री दत्तजयंतीच्याच दिवशी देता आले हे आमचे भाग्यच आहे असे मनोगत नगरसेविका सौ.अल्पना वरपे यांनी व्यक्त केले व त्याच बरोबर त्या परिसरात करण्यात आलेल्या व चालू असलेल्या विकासकामांची माहिती देखील दिली.
आमदार भिमरावआण्णा तापकीर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजासाठी व धर्मासाठी कार्य करणार्‍या अशा थोर व्यक्तिमत्वाचे नाव सदर पथाला देण्यात आल्या बद्दल समाधान व्यक्त केले.तसेच नगरसेवकांनी विविध विकास कामांबरोबरच असे समाज मनावर प्रभाव पाडणारे कार्यक्रम केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये नगरसेवक दिलीप वेडेपाटील,नगरसेवक किरण दगडेपाटील,नगरसेविका डाॅ.श्रद्धा प्रभुणे-पाठक,अॅड.गणेश वरपे,सचिन बदक,स्विकृत सदस्य वैभव मुरकुटे,बाळासाहेब टेमकर,प्रभाग अध्यक्ष सागर कडू,कैलास मोहोळ,राजेश कुलकर्णी,अक्षय ढाकणे,गणेश कोकाटे,प्रदिप जोरी,सुरेंद्र कंधारे,भरत मराठे,राजेश मनगिरे,कृष्णा भंडारी,विनिल मरे,तुषार धामंदे,रूपेश भोसले,राजीव निगडीकर,अभिजीत धुमाळ,अजय भरेकर,विनायक वरपे,संतोष महाजन,सिद्धेश कवडे,अजित शिगवण,अमोल शिर्के,रोहित जाधव,ओंकार शिंदे आदि पदाधिकारी तसेच सोनियाताई महाजन,सुप्रियाताई माझिरे,डाॅ.मनिषाताई जाधव,जान्हवीताई जोशी,अंजलीताई पाटील,सुहासिनीताई शिराढोणकर,शिल्पाताई कवडे,सुर्यवंशी मॅडम आदि महिला पदाधिकारी तसेच दत्तात्रय चोंधे,राजेंद्रजी भोसले साहेब,अॅड.ज्ञानेश्वर पानसरे,भगत,नाना कवडे,राजाभाऊ जोरी,तानाजी भरेकर,तात्या कुंबरे,बाळासाहेब शेडगे,पळसकर काका,कदमबांडे साहेब,योगेश कदम,साहेबराव मोरे आदि मान्यवर व ॐ दत्त परिवार परिसरातिल नागरिक व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close