माय मुळशी
Trending

विरोध डावलून हिंजवडी ग्रामसेवकपदी तुळशीराम रायकर यांची पुन्हा वर्णी, ग्रामस्थांचा तिव्र विरोध

महावार्ता न्यूज ः हिंजवडी ग्रामपंचायतीमधील अनेक चुकीच्या कारभारला जबारदार असणारे ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर यांनी 3 महिन्यात पिरंगुटमध्येही उदासीन कारभार केल्यानंतर महिनाभराच्या विश्रांतीनंतर अखेर पुन्हा त्यांची बदली पुन्हा हिंजवडीत करण्यात आली आहे. मात्र गावात हा अधिकारी नकोच अशीच भूमिका हिंजवडी ग्रामस्थांनीही पुन्हा घेतली आहे.
हिंजवडी ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व गावाचा विरोध असल्याने रायकर यांना हिंजवडीत पुन्हा न पाठविण्याबाबत पंचायत समितीने नोव्हेंबरमध्ये हिरवा कंदिल दर्शविला होता. 2021 च्या वर्षाअखेरीस पुन्हा रायकर यांनी हिंजवडीत बदली झाल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहेत. रायकर यांनीही हिंजवडी नको असे सूचित केले होते, तरीही कोणत्या सेटिंगने ते पुन्हा हिंजवडीत आले या अजून गुलदत्यात आहे.
ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर बदलींच्या मुद्दावरून नोव्हेंबरचा शेवटचा मंगळवार पौडमधील पंचायत समितीच्या परिसरात दिवसभर चर्चेत होता. हिंजवडीतील कार्यकालात तत्कालीन सरपंचांच्या मर्जीत अनेक चुकीची कामे तुळशीराम रायकर यांनी केल्यांचा आरोप आहे. यामुळेच 3 महिन्यापूर्वी नव्या सरपंच पदाची निवडणुक होण्यासाठी ते सक्तीच्या रजेवर गेले होते. पिरंगुट आणि हिंजवडीतील ग्रामविकास अधिकार्‍यांची अदलाबदल करून हा मुद्दा गटविकास अधिकार्‍यांनी तात्पुरता मार्गी लावला होता.
हिंजवडीतून रायकर यांना काही पदाधिकार्‍यांचा विरोध तर काही पदाधिकार्‍यांचा पाठिंबा आहे. रायकर यांची तात्पुरता हिंजवडीत रूजू होण्यास सांगितले आहे.
– संदिप जठार, गटविकास अधिकारी, मुळशी
पिरंगुटमध्ये गेली 3 महिने तुळशीराम रायकर यांनी काहीच कामे केली नसल्याचा ठपका पदाधिकार्‍यांनी ठेवला आहे. 2 कोटींची 19 विकासकामे रायकर यांच्यामुळे प्रलंबित असल्याने अखेर रायकर यांची पिरंगुटमधून गच्छंती करण्यात आली. हिंजवडीतील त्याच्या बदलीचा निर्णय स्थगित ठेवून महिनाभरसाठी माणचे ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी हिंजवडीचा अतिरिक्त कारभार देण्यात आला होता.
आता 4 महिन्यानंतर पुन्हा रायकर यांना हिंजवडीला रजू होण्याचा निर्णय झाला आहे. मात्र हिंजवडीत तुळशीराम रायकर नकोच ही भूमिका काही ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी घेतली आहे. यामुळे कोटींची रूपयांचा उलाढाल असणार्‍या हिंजवडी ग्रामपंचायतीचा कारभार हा रायकर कोणच्या मर्जीनुसार चालविणार हा मावळत्या वर्षांचा अनुत्तरीत प्रश्न नव्या वर्षातही कायम रहाणार आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close