
महावार्ता न्यूज : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मुळशी तालुक्यातील अ वर्ग गटातून सुनील चांदेरे विजयी झाल्याबद्दल मुळशीतील पत्रकार व संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दिलीपअण्णा दगडे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
कोथरूड येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन दिलीप दगडे यांनी सुनिल चांदेरे यांचा गौरव केला. याप्रसंगी बावधनचे माजी उपसरपंच नंदकुमार दगडे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक अंकुश उभे, सुहास दगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पौड येथे नवनिर्वाचित संचालक सुनिल चांदेरे यांची पौड स्टँड ते तहसील कार्यालयापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर डाॅ. बाळासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला चांदेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी महावार्ताचे संपादक संजय दुधाणे, पत्रकार संघ मुळशीचे अध्यक्ष रमेश ससार, पत्रकार प्रदिप पाटील, दीपक सोनावणे, सचीन केदारी, तेजस जोगावडे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त उपस्थित होते.
Share