माय मुळशी
Trending
मुळशीतून धनशक्ती पराभूत, कार्यकर्ता विजयी, पीडीसीसीवर सुनील चांदेरेंनी फडकविला झेंडा
राष्ट्रवादीच्या पक्षाच्या एकजूटीचा विजय,

महावार्ता न्यूज ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत अखेर राष्ट्रवादी पक्षाच्या सुनील चांदेरे यांनी परिवर्तन घडवून 26-19 मतांनी अनुभवी आत्माराम कलाटेंवर दणदणीत विजय मिळवला.
मुळशी तालुक्यात 95.23 टक्के मतदान झाले. मुळशीतून अ गटात 45 सोसायट्यांनी मतदान केले. राष्ट्रवादीतील काही वरीष्ठ मंडळींनी पडद्याआडून मदत केल्याने कलाटे यांचे पारडे शेवटच्या टप्प्यात जड असल्याचे चित्र होते. प्रत्यक्षात जाहिर केल्यानुसार 25 पेक्षा जास्त मते सुनील चांदेरे यांनी मिळवून राष्ट्रवादी पक्षाची शान उंचावली आहे.

4 वेळा निवडून आलेेले आत्माराम कलाटे यांनी धनशक्तीचा वापर केला होता, तर राष्ट्रवादीने नियोजनबध्द यशाचा किल्ला सर केला आहे. यामुळे धनशक्तीचा पराभव झाला तर कार्यकर्त्याचा विजय असा मुळशीत जयघोष सुरू झाला आहे.
मंगळवारी 4 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार असून राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळाल्यामुळे सुनील चांदेरे विजयी होवून परिवर्तन करणार की आत्माराम कलाटे परंपरा कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुळशी तालुक्यात 46 विकास सोसायट्या आहेत. तथापि जामगावला प्रतिनिधीच न मिळाल्याने 45 सोसायट्यातील प्रतिनिधीनाच मतदानाचा करण्याची संधी मिळाली. यापैकी 26 मते सुनील चांदेर यांना तर 19 मते पराभूत आत्माराम कलाटे यांनी मिळाली.
Share