माय मुळशी
Trending

हिंजवडीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरोग्य शिबीर,जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा ” अभियान

महावार्ता न्यूज:  महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 29 डिसेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार संपुर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये दिनांक 3 जानेवारी 2022 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत ” जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा ” अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी येथे शतायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात आले.
या शिबिरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले ते शतायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर्स श्री डॉ. योगेंद्र पांडे, श्री. बाळासाहेब घोटकुले, श्री. युगेश दातार, डॉ. एकता माने, डॉ दिपक सिंग, एडमिन स्मित गायकवाड, श्री. उपासिंग त्रिपुरा, मंगल बनसोडे व काजल घोड.
सदरच्या कार्यक्रमास मारुंजी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुरेश साबळे, जि प शाळा हिंजवडीचे मुख्याध्यापक श्री बापू येळे तसेच शाळेतील शिक्षक श्री धोंडिबा केसरकर , श्री अजय रमण वाळेकर, श्री दिलीप झोळ, श्रीमती शोभा कळमकर, श्रीमती निर्मला सोनवणे व सर्व शिक्षक उपस्थित होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close