पुणे
Trending
पेरिविंकल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना लसीकरण, अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी मानले प्रशासनाचे आभार

महावार्ता न्यूज ः कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुळशीत शाळामध्ये लसीकरण मोहिम राबवली जात असून पेरिविंकल स्कूलच्या बावधन, सूस व पिरंगुट शाखेत शनिवारी विद्यार्थ्यांनी लस घेतली.
मुळशी तालुक्यात 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी मुळशी आरोग्य विभागाने कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण मोहिम थेट शाळामध्ये सुरू केली आहे. या अंतर्गत बावधन येथील पेरिविंकल स्कूलमध्ये शनिवारी 150 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. मुठा आरोग्य केंद्रा अंतर्गत बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकेने विद्यार्थ्यांला लस दिली. यावेळी पेरिविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, शाळेचा मुख्याध्यापिका निलिमा व्यवहारे, योगेश सोनावणे, आरोग्य सेविका कल्पना खडके उपस्थित होते.
लसीकरणात जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या मुळशी तालुक्यात 15 ते 18 वयोगटातील लसीकरण वेगाने सुरू असल्याचे सांगून पेरिविंकल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल म्हणाले की, थेट शाळेत जाऊन लसीकरण करण्याचे शासनाचा उपक्रम आरोग्यदायी आहे. यामुळे कोरोनामुक्त शाळा सुरू राहण्यास मोठी मदत होणार आहे.
मुळशीत पौड शासकीय दवाखाना, माण, माले, मुठा व अांबवणे या 4 प्राथमिक आरोग्य उपक्रेंदाच्या कार्यक्षेत्रात 7 ठिकरणी लसीकरण युरू आहे. मुळशीत रोज 1500 विद्यार्थी लसीचा पहिला डोस घेत आहेत.
Share