माय मुळशी
Trending
मुळशीतील 35 गावे कोरोनाग्रस्त, तालुक्यात रूग्णसंख्या 700, हिंजवडीत सर्वाधिक रूग्ण, मारूंजी, माण, भूगाव, लवळे गावात 50 पेक्षा अधिक रूग्ण

महावार्ता न्यूज ः पुणे, पिंपरी चिंचवडच्या उंबरठ्यावर असलेल्या मुळशीतील कोरोना रूग्णसंख्या वेगाने वाढत असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत 35 गावातील 700 पेक्षा अधिक जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
आठवड्यापूर्वी केवळ 80 रूग्ण मुळशीत होते. आठ दिवसात 10 पटीने रूग्णवाढ झाल्याने मुळशीतील प्रशासन सतर्क झाले आहे. हिंजवडीत सर्वाधिक 284 रूग्ण असून मारूंजी, माण, भूगाव, लवळे गावात 50 पेक्षा अधिक रूग्ण उपचार घेत आहेत. मुळशीत सध्या रोज 100 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होत असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गावानुसार कोरोना रूग्ण पुढीलप्रमाणे
ताम्हिणी – 1
आंबवणे – 20
नांदगाव – 1
मांदेडे – 3
भरे – 1
दारवली – 3
कासारअंबोली – 14
कुळे – 1
माले – 1
आसदे – 1
खुबवली – 1
खेचरे – 1
पौड – 10
रावडे – 1
कोळवण – 1
माण – 62
हिंजवडी – 384
मारूंजी – 57
कासारसाई – 2
नेरे – 5
जवळ – 1
पिंपोळी – 1
रिहे – 1
भूगावं – 48
भुकूम – 30
लवळे – 71
दासवे – 1
सूस – 4
म्हाळुंगे – 1
नांदे – 5
पिरंगुट – 35
लवासा – 7
उरावडे – 2
Share