महाराष्ट्र
Trending
मुळशीत प्रथमच साजरा होणार महाराष्ट्र क्रीडा दिन , पेरिविंकलमध्ये खाशाबा जाधव पुरस्काराने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा होणार गौरव

महावार्ता न्यूज ः धु्रवतारा फाऊंडेशन व पेरिविंकल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या 97 वी जयंती निमित्त पुण्यात महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने तिसर्या खाशााब जाधव पुरस्काराने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा गौरव करण्यात येणार आहे.
15 जानेवारी हा भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पुण्यातील बावधन येथील पेरिविंकल स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांना अभिनव गु्रपचे संचालक श्यामकांत शेंडे व विधीतज्ञ रविंद्र शिंदे यांच्या हस्ते खाशाबा जाधव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याप्रसंगी पेरिविंकल स्कूलचे संस्थापक राजेंद्र बांदल व क्रीडालेखक संजय दुधाणे प्रमुख पाहुणे असणार आहेत. मानचिन्ह, शाल, श्रीफळ, क्रीडापुस्तके व पाच हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख यांचा खाशााब जाधव पुरस्कारान गौरव करण्यात आला आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील मानाची गदी जिंकल्यानंत राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी केल्याबद्दल कुस्तीगीर हर्षवर्धन सदगीरची यंदाच्या खाशाबा जाधव पुरस्काराकरीता निवड करण्यात आली असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र बांदल यांनी सांगितले.
15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून राज्यात साजरा व्हावा, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या यशोकिर्तीची स्मरण व्हावा यासाठी तिसर्यांदा कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे खाशाबा जाधव यांच्या पुस्तकाचे लेखक संजय दुधाणे यांनी सांगितले आहे.
Share