क्राइम
Trending
मुळशीत अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा, भुकूम, भूगावमध्ये 4 मजली इमारतीवर कारवाई

महावार्ता न्यूज: मुळशी तालुक्यातील भुकूम
येथील गट नंबर १६४ पै या ठिकाणी
पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम
निर्मूलन विभागामार्फत ग्राउंड अधिक ४ मजले असलेले सुमारे १३,२३९ स्क्वेअर फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. २८ मीटरचा बूम असलेल्या कटरच्या साह्याने हे बांधकाम पाडण्यात आले. तसेच सुमारे ५५९५ स्क्वेअर फूट व ४७९३ स्क्वेअर फुटाची दोन बांधकामे २ पोकलेनच्या साह्याने पाडण्यात आली, अशी सुमारे २३,६३६ स्क्वेअर फुटाची बांधकामे पाडण्यात आली.
पीएमआरडीचे अधिकारी व कर्मचारी कारवाई वेळी उपस्थित होते, तसेच स्थानिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांमार्फत बांधकामधारकांना परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये, असे आवाहन केले. या अनधिकृत बांधकामधारकांकडून बांधकाम निष्कासन खर्च वसूल करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले.
आठ दिवसांपूर्वीच भूगाव (ता. मुळशी) येथील पाच मजली अनधिकृत इमारत मंगळवारी (ता. १९) जमीनदोस्त करण्यात आली. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली पीएमआरडीए’च्या हहीतील भूगाव परिसरातील
सुमारे १९ हजार स्क्वेअर फुटाचे शॉपिंग कॉम्प्लेक्सचे
अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
Share