माय मुळशी
Trending

मुळशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सागर साखरे

महावार्ता न्यूज: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुळशी तालुकाध्यक्षपदी हिंजवडीचे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते सागर दत्तात्रय साखरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांच्या स्वाक्षरीसह या नियुक्तीचे पत्र नुकतेच साखरे यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे सामाजिक समतेचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहचवण्यासह पक्ष व युवक संघटनेचा विस्तार करण्याचा विश्वास घोटकुले यांनी साखरे यांच्याबद्दल व्यक्त केला आहे.या निवडीबद्दल तालुक्याच्या सर्व स्तरातून साखरे यांचे अभिनंदन केले जात आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close