
महावार्ता न्यूज: मुळशीती भुगांव आणि खांबोली ग्रामपंचायतीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत मतमोजणीस चुरस पहाण्यास मिळाली. भुगावमध्ये कालीदास विठ्ठल शेडगे अवघ्या 12 मतांनी तर खांबोलीत सोनाली नरेश खानेकर 10 मतांनी विजयी झाले.
भूगाव ग्रामपंचायतीच्या चार जागापैकी तीन जागासाठी अटातटीची लढत झाली. यामध्ये भुगाव येथे अमित घारे, वनिता तांगडे,योगेश्री शेडगे आणि कालिदास शेडगे तर खांबोली येथे सोनाली खानेकर विजयी झाले आहेत.मतमोजणी पौड येथे आज पार पडली.
भुगांव ग्रामपंचायत
वार्ड क्र २ : वनिता शिवाजी तांगडे ५३१ विजयी,
दिपाली ज्ञानेश्वर गावडे ४४१ नोटावॉर्ड क्र ३ सर्वसाधारण स्ञी : योगेश्री अनिलशेडगे ५१४ विजयी, मनिषा प्रदीप शेडगे३२,पल्लवी कालीदास शेडगे १६, नोटा १०
वॉर्ड क्र ३ ओबीसी पुरूष : कालीदास विठ्ठलशेडगे ४९८ विजयी, प्रशांत प्रकाश शेडगे ४८६, नोटा ६ग्रामपंचायत खांबोली : सर्वसाधारण स्ञी :सोनाली नरेश खानेकर १६३ विजयी, प्रियांका गंगाराम तावरे १५३, नोटा ७
भुगांव येथील ग्रामपंचायततीच्या तीन
जागासाठी मागील महिन्यात मतदान झाले होते
तर काल मंगळवार ( दि.१८ ) रोजी एका
जागेसाठी मतदान झाले. या चारही जागाची
मतमोजणी पौड येथील सेनापती बापट
सभागृहात पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय
अधिकारी म्हणून नायब तहसिलदार मिसाळ
यांनी काम पाहिले.
Share