जगाच्या पाठीवर
Trending

आज 23 जानेवारी..नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्ताने माझ्या जपान भेटीत नेताजींच्या स्मृतिस्थळी जागवलेली देशभक्ती… –  संजय दुधाणे 

संजय दुधाणे 

गतवर्षी ऑलिम्पिकनिमित्ताने जपानमध्ये पाऊल ठेवताच नेताजींच्या स्मृती स्थळला भेट देण्याचा मानस होता. ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वीच जपानमधील मित्र अजय डाके व राहुल बापट यांनी रेंकोजीमधील नेताजींच्या पुतळ्यास भेट दयावे हे आर्वजून सांगितले होते.
योग जुळून आले. 9 ऑगस्ट क्रांतीदिनाचा सारखा पवित्र मुहूर्त सापडला. अजय, राहुलला आपण क्रांतीदिन साजरा करण्याबाबत कळवले. या दोन मराठमोळ्या देशभक्तांनी पुष्पगुच्छ आणण्यापासून ते मला रेंकोजी मंदिरापर्यंत नेण्याचे नियोजन केले. त्याचा उत्साह पाहून न्यूज 18 लोकमतचे संपादक अशुतोष पाटील यांना मी क्रांतीदिनाचा कार्यक्रम लाईव्ह करू शकतो का ही विनंती केली. त्यांनीही क्षणात करू यात असा रिप्लाय देत बुलेटिनच्या टीमला सज्ज रहाण्यास सांगितले. ऑलिम्पिक वृत्ताकंनाकरीताच मी टोकियो गाठले होते. ऑलिम्पिक संपताच माझे कामही संपले होते. तरीही हा विशेष क्रांतीदिनचा कार्यक्रम करण्यासाठी होकार देत पाटील यांच्यासह न्यूज 18 लोकमत चॅनेलनेही आपल्या देशभक्तीचे दर्शन घडवले होते.

9 ऑगस्ट 1942 रोजी इंग्रजांनी देश सोडून जावे म्हणून गांधीजींनी ’छोडो भारत’ आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाने देशात क्रांतीची मशाला पेटली होती. स्वातंत्र्यानंतर 9 ऑगस्ट हा दिवस क्रांतीदिन देशभर साजरा होतो. 2021 चा ऑगस्ट क्रांतीदिन टोकियोतील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थिंने पावन असलेल्या बुध्द धर्माच्या रेंकोजी मंदिरात आम्ही साजरा करणार होतो.
टोकायोतील प्राचीन रेंकोजी मंदिर परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला मानवंदना देत जपानामधील मराठमोळ्या युवकांनी 9 ऑगस्ट क्रांती साजरा केला. 6 मराठमोळे व आम्ही दोन पत्रकार एकत्र येऊन जाज्वल्य देशभक्तीचे दर्शन घडविले. नेताजींच्या प्रेरक पुतळ्यास पुष्पगुच्छ अर्पण करून भारत माता की जय, नेताजी सुभाषचंद्र बोस की जय, ईंदो बांझायचा जयघोषात ऑगस्ट क्रांती दिन जल्लोष सार्‍या जगभर घुमला तो न्यूज 18 लोकमतच्या लाईव्ह प्रेक्षपणाने. नरेन देसाई, अजय डाके, राहुल बापट, तुषार चासकर , सुशील जाधव, मानसी नाईक या मराठमोळ्या जपानीज मंडळींनी माझ्यासोबत नेताजींच्या आठवणी सांगत क्रांतीदिनेचे माहाम्य प्रकट केले. असा कार्यक्रम व्हावा ही कदाचित नेताजींची इच्छा असावी. आम्ही काहीच नियोजन केले नव्हते. केवळ रेंकोजी मंदिरात एकत्र येण्याचे योजले होते. अजय-राहुलने हाक दिली. 8 मराठमोळ्यांनी क्रांतिदिन साजरा केला. माझ्यासाठी न भूतो न भविष्यति असा प्रसंग होता. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी, 26 जानेवारीच्या प्रचासत्ताक दिनी जो जोश असतो तोच आज सर्वांमध्ये प्रकट झाला होता.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पवित्र अस्थीने पावन असलेल्या स्थळाचे महात्म्य नरेन देसाई यांनी सांगितले. नेताजींच्या आठवणींना राहुल बापट यांनी उजाळा दिला. तुम मुझे खून दो,.मै तुम्हे आझादी दूंगा हा नारा सर्वप्रथम जपान मध्ये घुमला होता असे सांगून राहुल बापट पुढे म्हणाले की नेताजींनी चलो दिल्लीची हाक जपानमधूनच दिली होती. अजय डाके यांनी आपल्या वडिलांच्या भेटीचा अनुभव सांगितला. त्यांनी हे पवित्र स्थळ पहाण्याचे होते. बापलेक जेव्हा नेताजींच्या प्रतिमे समोर नतमस्तक झाले तेव्हा वडिलांचा हात नकळत सलाम करण्यासाठी वर गेला ही आठवण अजयने सांगितली.
न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून जगभरातील हजारो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चाहत्यांनी या कार्यक्रम पाहिला. लाईव्ह प्रक्षेपणाही शेकडो भारतीयांनी पाहिले. कार्यक्रम संपल्यानंतर सोशल मिडियावर हा कार्यक्रमाला लाखो लाईक्स मिळाल्या. इतिहासात प्रथमच रेंकोजी मंदिर परिसरातून लाईव्ह कार्यक्रम साजरा करण्याचे भाग्य मला लाभले होते. 2019 मध्ये क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचे वृत्तांकन करण्यासाठी लंडनला गेलो होतो. तेव्हा महात्मा गांधींच्या पुतळ्यास आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घराला दिलेली ग्रेटभेट मला आठवली. नेताजींची काबिज केलेल्या इंन्फाळच्या शौर्यस्थळाच्या आठवण जागी झाली.
तास-दिडतास आम्ही रेंकोजीच्या पवित्र स्थळी होते. देशभक्तींने ओथंबिलेले. जाता-जाता नेताजींच्या प्रतिमेस मी सलाम दिला, त्याच्या अस्थिमंदिरा बाहेर नतमस्तक झालो. दिवसभर क्रांतीदिनाच्या प्रेरक कार्यक्रमाने मी पुलकित झालो होतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घराबाहेर पडताना पाऊल जड झाले होते तशीची अनुभूती रेंकोजी मंदिरातून बाहेर पडताना आली. मायदेशी परतल्यानंतर अनेकानी सत्कार केले, अनुभव कथनाचे कार्यक्रम आयेाजित केले. प्रत्येक ठिकाणी रेंकोजी मंदिरातील ते पावन क्षणांचा उल्लेख मी करण्यास विसरलो नाही. परमुलखात जाऊन नेतजींचा सलामी देत आम्ही क्रांतीदिन साजरा केलाय…ही आठवण मर्मबंधातील ठेवच बनली आहे….
प्राचीन रेंकोजी मंदिरात नेताजींच्या अस्थि
जपानी पागोडा शैलीतील प्राचीन रेंकोजी मंदिरांची उभारणी 1594 मध्ये करण्यात सुगिनामी परिसरात करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर 18 सप्टेंबर रोजी त्याच्या अस्थी या पवित्र मंदिरात जतन करण्यात आल्या. छोट्याच्या पेटीत नेताजींच्या अस्थि आजही सुरिक्षत आहे. आझाद हिंंद सेनेच्या सैनिकांनी त्यांचा अर्धाकृती पुतळाही या पवित्र स्थळी स्थापित केला. पहिल्या मजल्यावर प्राचीन रेंकोजी मंदिराचे देवालय असून तळमजल्यावरील जीनाच्या डाव्या बाजूस नेताजींचा पुतळा तर उजव्या बाजूस अस्थि मंदिर आहे. ही पवित्र वास्तू 18 ऑगस्ट व नेताजींच्या 23 जानेवारी या जयंती दिनी नागरिकांसाठी खुले करण्यात येते. या दिवशी जपानीमधील नेताजींचे चाहते छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजनही करीत असतात.
1957 मध्ये जवाहरलाल नेहरू, 1969 इंदिरा गांधी तर 9 डिसेंबर 2001 अटलबिहारी वाजपेयी या भारताच्या पंतप्रधानांनी या पवित्र स्थळाला भेट दिली आहे. दुसर्‍यांदा या स्थळाला भेट दिल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी लिहिले होते की, मुझे रेंकोजी दोबारा आकर प्रसन्नता हुई, जहां भारतीय स्वतंत्रता संग्राम के महान सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस की स्मृतियां सुरक्षित हैं.

न्यूज 18 लोकमतवरील क्रांतदिन कार्यक्रमाचा व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close