
महावार्ता न्यूज : मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यातील मौजे कोळावडे येथील झाडाचीवाडी,आदर्शनगर,खडकवाडी व रस्त्या जवळील वसाहत* या वसाहतींना पुरेसा पाणी पुरवठा होणेसाठी *झाडाची वाडी येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईनचे भूमिपूजन* समारंभ पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या हस्ते झाला.
यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी सभापती *महादेव कोंढरे व मा.सुनिल चांदेरे व्हाईस चेअरमन पुणे जिल्हा मध्य.सह.बॅक यांचे शुभहस्ते पार पडला याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सौ. कांबळे यांचे उपस्थितीत पार पडला याप्रसंगी ग्रामस्थांनी सदर कामांमध्ये आलेली अडचण विशद केली गावाला मोठ्या पाण्याच्या टाकी ची गरज असून नको असलेल्या कामाचे इस्टिमेट उल्लेखलेले गरज नसलेले आयटम कमी करून पाण्याच्या टाकीची क्षमता वाढविणे आवश्यक असून तसे काम मंजूर होणेबाबत मान्यवर यांना लक्ष घालण्यास सांगण्यात आले.
नियमात बदल करून कोळवडे गावासाठी लोकसंख्येचा निकष कमी करून एक लाख लिटरची पाण्याची टाकी मंजूर करणेबाबत माननीय शिवतरे यांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे व उद्याच जिल्हा परिषद येथे समंधित अधिकारी यांना बोलवून योग्य ती इस्टीमेंन्ट मधे दुरूस्ती सूचवून पुढील दोन दिवसांमध्ये यावर कार्यवाही करण्यात येईल,त्याच बरोबर सर्व वाडीतील पोच रस्ते 3054 अंतर्गत मंजूर करण्याचे अश्वसित करून पाणीपुरवठा योजनांसाठी सोलर सिस्टीम बसवल्यास कायमस्वरूपी गावाच्या विजदेयकाचा भार कमी होईल ,या साठी गावांनी पुढाकार घेण्यास सांगितले.
*यावेळी कोंढरे यांनी मुठा खोऱ्यामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत जवळजवळ साडेदहा कोटी रुपयांची कामे मंजूर* झालेले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात कामे केलेली आहेत व यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कामे होत राहतील असे सांगितले आम्ही कामच करत असतो व आम्ही प्रयत्न करून मंजूर केलेल्या कामांचेच आम्ही नारळ फोडतो दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आम्ही कधीही नारळ फोडत नाही याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला याप्रसंगी चांदेरे यांनी बोलताना आता मुळशी तालुक्यांमध्ये सहकार आणि पंचायतराज एकत्र आल्यामुळे एक दिलाने काम होऊन मोठ्या प्रमाणात विकासास चालना मिळेल असे सांगितले* पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज बरोबरच मध्यम व दिर्घ मुदतीची शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी व शेती अवजारे कर्ज तसेच कृषी पर्यटन व्यवसाया करता मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल तरी तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले *प्रास्ताविक श्री सयाजीराव आढाव माजी सरपंच यांनी केले तसेच संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक मा अंकुश उभे यांनी संपूर्ण काम कश्या प्रकारे झाले पाहीजे त्याबाबत योग्य ती दुरूस्ती करून पाणी टाकीची क्षमता वाढवून मिळावी हि कोळावडे ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली यावेळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते यामध्ये माजी सरपंच तुकाराम उभे,दत्तात्रय उभे, माजी सरपंच,उपसरपंच जनार्दन मारुती उभे ग्रामपंचायत सदस्य सौ. रूपाली मारुती शिंदे,सौ.कुंदा अनंता उभे,सौ.संगिता लक्ष्मण उभे तसेच कोळवडे गावातील माजी उपसरपंच लक्ष्मण उभे,तंटामुक्ती अध्यक्ष बबन तात्या मारणे, बाळासाहेब मोगल,तुकाराम दत्तात्रय मरे,विशाल चंद्रकांत उभे, भिकाराम उभे महीपती* *साधू शिंदे, मनोहर गोपाजी उभे,किसन मारुती उभे,शंकर लक्ष्मण उभे,निवृत्ती गेणू उभे,सोमाजी कानगुडे,निवृत्ती दगडू उभे, विठ्ठल दगडू उभे, मारुती चंद्रकांत उभे,विजय दत्तात्रय उभे, बाळासाहेब भिकोबा उभे,भाऊ लक्ष्मण उभे,विठ्ठल सयाजी* *आढाव, सखाराम रत्नू उभे,मारुती गोपाळ शिंदे,दामोदर गोपाळा उभे,रमेश मोगल, अनंता वाघू उभे,भाऊ लक्ष्मण उभे, मधुकर* *गोपाळ उभे,नामदेव कृष्णा उभे,मारुती महादू उभे, बबन महादू उभे तसेच मोठ्या प्रमाणावर गावातील महिला भगिनी उपस्थित होत्या.पाणी टाकीसाठीची जागा श्री राहुल चंद्रकांत कडू यांनी बक्षीसपत्र करून दिली.उपस्थितांचे आभार माजी सरपंच दत्तात्रय उभे यांनी मानले*
Share