माय मुळशी
Trending
मुळशीत प्रजासत्ताक पूर्वसंध्येला 50पेक्षा अधिक शासकीय कर्मचारी, पोलीस कोरोनाग्रस्त, 1852 जण होम क्कारंटाईन

महावार्ता न्यूज ः कोरोना योध्दे ठरलेले मुळशीतील तहसील, पंचायत समिती, पौड पोलीस दलातील 50 पेक्षा अधिक कर्मचारी कोरोनाग्रस्त असून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 1852 जण कोव्हिड पाॅझिटिव्ह रूग्ण घरीच उपचार घेत आहे.
गत आठवड्यात आरोग्य अधिकारी डॉ.अजीत करंजकर यांच्यासह मुळशी पंचायत समितीतील 10 पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी होते. तहसील, भूमी अभिलेख कार्यालयात
कोरोना पॉझिटिव्ह असून पौड पोलीस दलातील 12 जण उपचार घेत आहेत.
कोरोनाच्या तिसर्या लाटेत 100 पेक्षा अधिक रूग्ण मुळशीत रोज आढळून येत आहे. मंगळवारी मुळशीतील 19 गावांत 194 रूग्ण सापडले. रूग्णसंख्येने धोक्याची पातळी पार केली असून मुळशीतील 55 गावांना कोरोनाने घेरले असून 1853 रूग्ण उपचार घेत आहेत.
हिंजवडीत सर्वाधिक 91 रूग्ण मंगळवारी आढळले
असून मारूंजी, माण, भूगाव, मारूंजीव लवळे गावात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पिरंगुट, पौड, बावधन, भुकूम गावातही अधिक लोकांना कोरोनाची लागण होत असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मुळशी कोरोना अपडेट
Share