माय मुळशी
Trending
आमदार थोपटे शुक्रवारी मुळशीत मॅरेथॉन बैठकीनंतर करणार पावणेदोन कोटीच्या विकासकामांचा शुभारंभ

महावार्ता न्यूज ः मुळशीचे आमदार संग्राम थोपटे शुक्रवारी 28 जानेवारी रोजी तहसील कचेरीत संजय गांधी योजना, दक्षता कमिटी, तालुका क्रीडा संकुल, शिक्षण समिती, भष्ट्राचार निर्मलन, बालविकास, विद्युत वितरण कमिटीच्या मॅरेथॉन बैठकाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्यापूर्वी तालका कॉग्रेस कमिटीच्या बैठकीला ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. बैठकानंतर दुपारी 1 कोटी खर्चाच्या रिहे रस्ता पूलासह खर्चाच्या विकासकामांचे शुभारंभ आमदार थोपटे यांच्या हस्ते होईल.
भोर विधान सभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून रिहे खोऱ्यासाठी भरघोस निधी मिळाला असून तब्बल पावणेदोन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ उद्या (शुक्रवारी दि 28) दुपारी तीन वाजता रिहे खोऱ्यात होणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली.
मातेरे म्हणाले, रिहे खोऱ्याला जोडणारा रिहे येथील ओढ्यावरील पुलासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून उर्वरित वाड्या वस्त्यासाठी अंतर्गत रस्ते , स्मशानभूमी व सभांडपांची भूमिपूजन तसेच काही ठिकाणच्या पूर्ण झालेल्या विकास कामांची उद्घाटन आमदारांच्या शुभहस्ते होणार आहेत.
पावणेदोन कोटीच्या विकासकामे पुढीनप्रमाणे
रिहे रस्ता पूल 1 कोटी
गावठाण येथे सामाजीक सभाग्रह बांधणे 5 लाखपालवेवस्ती अर्तगत रस्ता करणे 5 लाख
बोरकरवाडी ते करंजई मंदिर रस्ता करणे 5 लाख
मोरेवाडी स्मशानभुमी परीसर सुशोभिकरण करणे 5 लाख
मोरेवाडी पालवेपडाळ रस्ता करणे 5 लाख
मोरेवाडी जोडरस्ता करणे 15 लाख
पडळघरवाडी चंद्रकांत पडळघरे यांचे घराजवळ रस्ता 5 लाख
शेळकेवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे 5 लाख
सामाजिक सभागृह बांधण 5 लाख
गवारेवाडी अंतर्गत रस्ता करणे 5 लाख
गवारेवाडी अंतर्गत रस्ता करणे 5 लाख
स्मशान मुमीकडे जाणारा रस्ता करणे 5 लाख
सभामंडप 5 लाख
Share