माय मुळशी
Trending
सुतारवाडी ते पिरंगुट वाहतूक रोडवेज कंपनीच्या नियोजन शून्य कामामुळे धोकादायक, आरोग्यही धोक्यात : आबासाहेब शेळके
निवदेनाची दखल न घेतल्यास शिवसेना आंदोलन करणार

महावार्ता न्यूज ः पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गाचे रोडवेज कंपनीकडून सध्या सुरू असलेल्या ढिसाळ पद्धतीच्या कामामुळे मुळशीतील नागरिकांचे आले आहे. प्रशासन व कंत्राटदार कंपनीच्या गलथान कारभारापायी महामार्गावरून ये – जा करणारे प्रवासी तसेच महामार्गालागतचे व्यापारी यांच्या जिवीतालाच धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे कंपनीने या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे याबाबतचे निवेदन मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.
यावेळी मुळशी तालुका नेते आबासाहेब शेळके,महादेव मरगळे, सहकार आघाडीचे ज्ञानेश्वर डफळ,शाकिर शेख यांनी रोडवेज कंपनीचे इनचार्ज ए. पी. चौधरी, असिस्टंट नितीन तिवारी यांना दिले .
यावेळी बोलताना आबासाहेब शेळके म्हणाले की कंपनी अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही व नागरिकांच्या जिविताला हानी पोहचली तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच प्रवाशाना अपघात झाल्यास कंपनी विरोधात मनुष्य वधासारखे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू. असा सज्जड दमच शेळके यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना भरला.
गेली दोन अडीच वर्षे होऊनही या महा मार्गाचे काम अत्यन्त संथ गतीने सुरू आहे. रोडवेज कंपनीच्या नियोजन शून्य कामामुळे सुतारवाडी ते पिरंगुट पर्यँतीची वाहतूक तर अत्यन्त धोकादायक बनली आहे. या भागात गेल्या सहा महिन्यांपासून अत्यन्त दिरंगाईने काम सुरू आहे. एकेरी व अरुंद वाहतूक तसेच या ठिकाणी डस्ट ,कच व उकरकेल्या मातीमुळे वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे.
या भागात दुचाकीस्वारांचे दररोज अपघात होतात तसेच धुळीमुळे, डोळ्यांचे व श्वसनाचे विकार त्याचबरोबर किडनी स्टोन सारखे विकारही नागरिकांना मोठ्या प्रमाणात उदभवू लागले आहेत. या मुळे या भागातील नागरिकांच्या जिवीतलाच धोका निर्माण झाला आहे.
याबाबत पत्रकार बांधव विविध प्रसार माध्यमातून तसेच नागरिकही सोशल मिडीयातून सातत्याने आवाज उठवत असूनही मूग गिळून बसलेल्या प्रशासन व त्यांच्या पाठिंब्यामुळे निगरगठठ बनलेल्या रोडवेज कंपनीला अजिबात फरक पडताना दिसत नाही.
या समस्येबाबत वास्तव ने बातमी प्रसारित करताच शिवसेना पक्षाने या वृत्ताची दखल घेत नुकतेच एक खरमरीत असे निवेदन संबधीत कम्पनी व प्रशासनाला दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी भेट घेऊन सदर काम गुणवत्तापूर्ण व लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सज्जड दमच कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
Share