महाराष्ट्र
Trending
भुकूूम मठात शुक्रवारी माघ शुद्ध दशमीचा उत्सव, पालखी मिरवणुक -किर्तन -प्रवचनाव्दारे हरिनामाचा गजर

महावार्ता न्यूज ः मुळशी तालुक्यातील भूकूम गावाजवळील हरिराम आश्रय मठात शुक्रवारी 11 फेब्रुवारीला 54 वा माघ शुद्ध दशमीचा उत्सव हरिनामाच्या गजरात होणार आहे. कोरोनामुळे सलग दुसर्या वर्षी हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
संत गणोरेबाबांनी 1968 पासून सुरू केलेल्या माघ शुद्ध दशमी उत्सवाच्या अखंड हरिराम सप्ताहात काकड आरती, हरिपाठ हे कार्यक्रम सुरू आहेत. गुरूवारी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता हभप संतोष महाराज सुर्वे यांचे तर 11 फेब्रुवारीला हभप गणेश महारात कार्ले यांचे किर्तन होणार आहे.
माघ शुद्ध दशमीच्या दिनी संत तुकाराम महाराजांप्रमाणे संत गणोरेबाबा यांना अनुगृह मिळाला होता. या निमित्ताने होणार्या उत्सवाचा प्रारंभ संत गणोरेबाांच्या समाधी पादुकाच्या महाभिशेषाने होईल. त्यानंतर मठ परिसरात पादुका पालखी मिरवणुक काढण्यात देईल. काल्याचे किर्तन होण्यापूर्वी हभप एकनाथ हगवणे यांचे प्रवचन होईल.
कोव्हिड नियमामुळे सलग दुसर्या वर्षी सप्ताह रद्द करून केवळ माघ शुद्ध दशमीची दिवस मठात उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे गुरूवर्य गणोरेबाबा सेवा मंडळाचे विश्वस्त निनाद मुळे यांनी सांगितले.
Share