माय मुळशी
Trending

लवळे गावात हळदी-कुंक समारंभानिमित्त महिला सक्षमीकरणाचा नारा

महावार्ता न्यूज ः  लवळे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या हळदी–कुंकू समारंभला गावातील महिला भगिनींनी भरघोस प्रतिसाद दिला. आदर्श सरपंच निलेश गावडे यांच्या नियोजनबद्ध ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी – कुंकू हा समारंभ ग्रामपंचायतीच्या आवारा मध्ये आयोजित केला होता.
त्याप्रसंगी ऑक्सफर्ड ग्रुपच्या MD सौ.नीलमताई सेवलेकर यांनी महिलांनी सक्षम कसे व्हावे हे आपल्या मार्गदर्शना मध्ये सांगितले तसेच एन आर जी ग्रुपच्या डायरेक्टर सौ.सुनिताताई राऊत यांनी मार्गदर्शना मध्ये सांगितले की हळदी-कुंकू म्हणजे महिलांमध्ये सुसंवाद होण्यासाठी व विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून समारंभ साजरा केला जातो.व आय.ए.एस.अॅकॅडमीच्या डायरेक्टर मा.सरपंच सौ.वैशालीताई सातव यांनी हळदी-कुंकू याचे महत्व काय असते ते आपल्या मार्गदर्शना मध्ये सांगितले.श्रीमती रंजनाकाकू गावडे व सौ.वर्षाताई गावडे यांनी महिला भगीनीना हळदी-कुंकू व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळेस आदर्श सरपंच श्री.निलेशभाऊ गावडे,उपसरपंच कु.रंजित राऊत,विद्यमान सदस्य श्री संजयआबा सातव ,ग्रामविकास अधिकारी श्री.व्ही डी साकोरे,ग्रा.पं.सदस्या सौ.नर्मदाताई टकले सौ.सुजाता ताई मोरे,सौ.किमयाताई गावडे.सौ. वर्षाताई राऊत,सौ.सारिका ताई कळमकर, सौ.सायलीताई सातव,सौ.साधनाताई सातव,श्रीमती राणीताई केदारी, डॉ.सौ.सोनालीताई सातव,सौ.अर्चनाताई आढाव माण सरपंच सौ.ज्योतीताई धुमाळ,सौ.सविताताई पांडूरंग ओझरकर सौ.आरतीताई तापकीर,सौ.अर्चनाताई गवारे रा.कॉ. महिला अध्यक्षा सौ.सारीकाताई शिंदे,रा.काॅ.युवती उपाध्यक्षा कु.अंजली केदारी,मा.सरपंच सौ.सविताताई गावडे, ग्रा.पं.सदस्य श्री.अजित चांदीलकर,श्री.बाळासाहेब राऊत,श्री.राहुल खरात,श्री.शिवराम सातव सामाजिक कार्यकर्ते
श्री.गणेशशेठ गावडे, श्री.दत्ताभाऊ मोरे श्री.अमोल सातव,श्री.महेश सातव,श्री.पोपट कळमकर,श्री.ऋषिकेश राऊत,श्री.योगेश मारणे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.समारंभाचे सूत्रसंचालन मा.सरपंच विद्यमान सदस्य श्री.संजयआबा सातव यांनी केले.ग्रा.पं.सदस्या सौ.वर्षाताई राऊत यांनी प्रस्तावना केली.व ग्रा.पं.सदस्या सौ.किमयाताई गावडे यांनी सर्वाचे आभार मानले.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close