क्राइम
Trending
हिंजवडीतील मॉलचे सांडपाणी थेट शेतकर्यांच्या विहिरीत, शेतात, म्हैस मृत्यूमुखी, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात

हिंजवडी ः हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतील आयपार्क पेझ 2 मधील ग्रँड हायस्ट्रिट मॉलचे सांडपाणी थेट ग्लोबल इंडस्ट्रियल पार्क जवळील शेतकर्यांच्या शेतात व विहिरीत आल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. शेतीतील विहिरीतत पाणी झिरविल्याने व दुर्गंधीमुळे परिसरातील 20 पेक्षा अधिक कुटुंबियाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हिंजवडीत नव्याने सुरू झालेल्या ग्रँड हायस्ट्रिट मॉलच्या व्यवस्थापनाने सांडपाणी सोडण्याची अधिकृत व्यवस्था न केल्याने हे सांडपाणी हरिभाऊ वाघमारे यांच्या शेतात पसरले आहे. यामुळे विहिरीचे पाणीही दूषित झाले असून एका म्हशीचा मृत्यूही झाला आहे. सांडपाण्यामुळे गहू व भातपिकाचे नुकसानही झाले आहे.
शेतजवळ सांडपाणी खुले वाहत असल्याने दुर्गंधीमुळे परिसरातील 20 पेक्षा अधिक कुटुंबियाचे आरोग्य धोकादायक बनले आहे
ग्रँड हायस्ट्रिट मॉलमुळे पाणी, हवेत प्रदूर्षण झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी दिल्यानंतर हिंजवडी ग्रामपंचायतीने तातडीने घडनास्थळी भेट दिली आहे. सरपंच विशाल साखरे याबाबत म्हणाले की, ग्रँड हायस्ट्रिट मॉलकडे सांडपाण्याची चौकशी केली असून मॉलच्या व्यवस्थापनाने दोन दिवसात ते बंद करण्यात येईल असे सांगितले आहे. दरम्यान हिंजवडीतील तलाठी कार्यालयाने याची दखल घेत झालेल्या नुकसानीचा पंचनामा तहसीलकडे कार्यालयाकडे पाठविण्याची कार्यवाही केली आहे.
Share