खेळ खेळाडू
Trending
पुणे मनपा क्रीडा संग्रहालयाच्या 37 लाखांच्या निविदांना स्थगिती, क्रीडा विभागाच्या सूचना आल्यानंतरच पुढील कार्यवाही करणार ः शिवाजी लंके, कार्यकारी अभियंता

पुणे ः पुणे मनपाच्या सणस मैदानात होत असलेल्या क्रीडा संग्रहालयाच्या 37 लाखांच्या नव्या कामांच्या निविदांना तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. मनपाचा क्रीडा विभाग, पुण्यातील क्रीडा तंज्ञ, जाणकार यांना पूर्णपणे अंधारात ठेवून क्रीडा संग्रहालय व क्रीडा माहिती केंद्राची निविदा भवन रचना विभागाने काढली असल्याची तक्रारेची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गत आठवडयात सणस मैदानातील क्रीडा संग्रहलाच्या इमारतीत दारूच्या बाटल्या आढळल्याने पुण्यातील क्रीडाक्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. आता याच क्रीडासंग्रहालयासाठी चुकीचे कामे होणार हे निर्दशनास आल्याने पुणे मनपाचे कार्यकारी अभियंता शिवाजी लंके यांनी निविदांना स्थगिती देत क्रीडा विभागाच्या सूचना आल्यानंतरच पुढील कार्यवाही केले जाईल असे पत्र जाहिर केले आहे.
पुणे मनपाच्या भवन विभागाने निविदा क्रमांक – पीएमसी / भवन / 227/2021-22, कै. बाबूराव सणस मैदान येथील स्पोर्टंस् म्युझियम इमारतीमध्ये क्रीडा माहिती केंद्र नव्याने सुरू करणे एकूण निविदा रक्कम – 13,34,322
व निविदा क्रमांक – पीएमसी / भवन / 228/2021-22, प्रभाग क्र. 29 अ मध्ये सणस गाऊंड येथे नव्याने विकसीत होत असलेल्या स्पोर्टस् म्युझियमची अर्धवट कामे पूर्ण करणे, एकूण निविदा रक्कम – 24,05306 या निविदा प्रसिध्द केल्या होत्या.
सदरच्या दोन्ही निविदा काढताना मनपाच्या पॅनेलवर नसलेल्या व क्रीडा क्षेत्राची जाण नसलेल्या इंटेरिअर डिझायनरने पूर्णपणे चुकीचा आराखडा सुचविलेला होता. संग्रहालयाच्या कामांचा कोणताही अनुभव नसताना कोणतेही डिझाईन हाती नसताना, म्युरलवर 10 लाख 26 हजार तर छायाचित्रांचे व्हेनेल साठी 1 लाख 66 हजार खर्च सुचविण्यात आला होता.
मनपाच्या अधिकार्यांना, क्रीडा विभागाला तसेच पुण्यातील क्रीडा संग्रहालयातील तंज्ञाना पूर्णपणे अंधारात ठेवून निविदेच्या या चुकीच्या आराखड्याला ऑलिम्पिकपटू बाळकृष्ण अकोटकर, छत्रपती पुरस्कार सन्मानित रणजीत चामले यांच्यासह पुण्यातील क्रीडा पत्रकारांनी विरोध दर्शविला होता. अनेकांनी या संग्रहालयाच्या प्रकल्पाला भेट देऊन मनपाच्या प्रकल्पाचे कौतुक केले होते, मात्र कामांच्या दर्जा व अपुर्या कामांबाबत नाराजीही व्यक्त केली होती. यापैकी अनेकांनी मनपाचे भवन अधिकारी शिवाजी लंके यांची भेट देऊन वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र या जाणकरांच्या मार्गदर्शन न घेता चुकीच्या पध्दतीने घाईघाईत पुण्यातील क्रीडा संग्रहालय पूर्ण करण्याचा चुकीचा घाट आला होता.
पुण्यातील क्रीडा जाणकार, मनपाचे क्रीडा अधिकारी संतोष वारूळे, भवन विभागाचे अधिकारी यांच्या बैठकीनंतर क्रीडा विभागाच्या सूचनेनंतरच 37 लाखांच्या नव्या कामांच्या निविदांना मंजुरी दिली जाईल असे मनपाच्या भवन विभागने स्पष्ट केले आहे.
Share