महाराष्ट्र
Trending

मुळशीकरांचे आधारस्तंभ वपूशेठ ऊर्फ विप्रदास मेणकर यांचे दुःखद निधन

महावार्ता न्यूज: मुळशीतील हिंजवडी भागातील सुप्रसिद्ध उद्योजक,विनयशील,गोरगरीबांचे कैवारी,दानशुर दाता,युवकांचे उर्जास्त्रोस्त,कर्तव्य दक्ष,मानवकल्याण शुभ संकल्पी,विद्या व विद्यार्थी प्रेमी वपूशेठ ऊर्फ श्री.विप्रदास चंद्रकांत मेणकर यांचे दुःखद
निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.
मेणकर कुटुंबातील मोठा आधारस्तंभ असणाऱ्यामेणकर साहेबांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून
(कस्तुरे चौक डाळ आळी) येथून निघेल.
अंत्यविधी लिंगायत स्मशान भूमी,जानाई मळा,
टिम्बर मार्केट येथे होणार आहे.

मुळशीतील सामाजिक कार्यात मेणकर यांचा सहभाग असायचा. मुळशी धरणग्रस्तांच्या स्मरणिकेसाठी त्यांनी आर्थिक मदत केली होती. हिंजवडी परिसरातील युवकांना उद्योजक होण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. प्रगतीशील शेतकरी हरिभाऊ वाघमारे यांचे ते घनिष्ठ मित्र होते
महावार्ता न्यूज परिवार व मुळशी पत्रकारांच्या वतीने वपूशेठ ऊर्फ  विप्रदास मेणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close