महाराष्ट्र
Trending

पेरिविंकलच्या 10 वी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ उत्साहात, गुण मिळवणे हे एकमेव ध्येय नसून एक उत्तम नागरिक होता आले पाहिजे – पोलीस अधीक्षक मीतेश घट्टे

महावार्ता न्यूज ः चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या सूस, बावधन व पिरंगुट या सर्व शाखांच्या इ. 10वी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ सूस शाखेत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. इयत्ता 10 वी च्या निरोप समारंभाचा क्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. पेरिविंकलच्या साजरीकरणाच्या परंपरेला स्मरून आज हा 10वी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ शिस्तबद्ध पद्धतीने व थाटामाटात पार पडला.
कार्यक्रमाचा प्रारंभ हा पारंपरिक सरस्वती पूजन व दीप्प्रज्वलन करून करण्यात आला. या प्रसंगी पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक  मीतेश घट्टे, पोलीस निरीक्षक अशोक धूमाळ , नगरसेवक  दिलीप वेडेपाटील, भाजपाचे पुणे शहराचे नेते राहुल कोकाटे, शिवसेनेच्या कार्यकर्त्या मा. सौ.रोहिणी धनकूडे , प्रतिभा धनकुडे,आरती चांदेरे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल संचालिका सौ रेखा बांदल, तसेच सर्व शाखांचे मुख्याध्यापक सौ निर्मल पंडित , नीलिमा व्यवहारे, अभिजित टकले,, रुचीरा खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्याना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत मान्यवरांच्या हस्ते शाळेकडून एक आठवण म्हणून भेटवस्तू देऊन सर्व विद्यार्थ्याना गौरविण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पोलीस अधीक्षक बघून सगळेजण भारावुन गेले. यांचे वक्तव्य ऐकून सर्वजण स्तिमित झाले. फक्त अभ्यासात चांगले गुण मिळवणे हे एकमेव ध्येय नसून एक उत्तम नागरिक होता आले पाहिजे असे सांगून त्यांनी प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे व प्रत्येकात गुण दडलेले आहेत फक्त ओळखता आले पाहिजे.. हिरा कुठेही चमकतो तसेच माणूस मनापासून ठरवले तर सगळ करू शकतो. फक्त आयुष्यात आपले ध्येय निश्चित करून त्यप्रमाणे वाटचाल केली की कुठलीच गोष्ट अवघड नसते असे प्रगल्भ विचार विद्यार्थ्याना सांगितले. घोडा व शर्यत तसेच मुलांची मनस्थिती व परिस्थिती यावर सांगितलेल्या कथा नक्कीच सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या स्वानुभवातून आलेले हे स्फूर्तीदायक विचार विद्यार्थ्याना नक्कीच प्रेरणा देऊन जातील.

तर रोहिणी ताई धनकुडे यांनी कितीही मोठे झालात तरी शाळेला व शिक्षकांना कधीही विसरू नका असा गुरुमंत्र सर्वांना देऊन त्यांचे मनोगत व्यक्त केले . तसेच नगरसेवक श्री दिलीप वेडेपाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात पेरिविंकल शाळेच्या छोट्या रोपट्या चे आज येवढ्या मोठ्या वटव्रुक्षात झालेले रूपांतर बघून अभिमान वाटतो व या प्रवासाचा मी साक्षीदार आहे असे त्यांच्या भाषणात नमूद करून अशीच पेरिविंकल ची उत्तरोत्तर प्रगती होवो व हा आलेख असाच उंचावत रहो यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल यांनी सर्व विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत व आज पेरिविंकल चा विद्यार्थी हा उद्याचा IPS किंवा IAS ऑफीसर असेल असे ध्येय निश्चित करून वाटचाल केली तर हे नक्की शक्य आहे असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर सूस शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी वेळेचे महत्व सांगून 7 पेपर ही जणू पुढील वाटचालीसाठी ची सप्तपदीआहे असे समजून नियमितपणे अभ्यास केला तर काही अवघड नाही असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close