
महावार्ता न्यूज ः मुळशीतील श्रीमंत ग्रामपंचायत व आयटी नगरी असलेल्या हिंजवडीला गुरूवारी नवा सरंपच मिळणार आहे. कार्यशील सदस्य शिवनाथ जांभुळकर नवे सरपंचपदी निवडून येणार आहे.
तीन महिन्यानंतर नवा सरपंच हा फॉर्म्युला ग्रामपंचायत निवडणुकीत ठरल्याने विशाल साखरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने शिवनाथ जांभुळकरांची निवड होणार आहे. विद्यमान ग्रामपंचायतीचे शिवनाथ जांभुळकर चौथै सरपंच ठरणार आहे. यापूर्वी गणेश जांभुळकर, विक्रम साखरे व विशाल साखरे यांनी सरपंचपद भूषवले होते.

हिंजवडीत ग्रामविकास श्री म्हातोबा परिवर्तन पॅनेल प्रमुखाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सलग दुुसर्यांदा निवडून आलेले शिवनाथ जांभुळकर यांच्या गळ्यात पडणार आहे. पंचायत समितीकडे विकास कामांचा यशस्वी पाठपुरावा करणारे शिवनाथ जांभुळकर हे सरपंच होणार असल्याने आता हिंजवडीच्या विकासाला गती मिळणार आहे. सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर यांच्या साथीने शिवनाथ जांभुळकर हेदेखिल आदर्श सरपंच होतील असा विश्वास हिंजवडी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
Share