माय मुळशी
Trending
शाळेला स्वःताचे रहाते घर देणारे कार्यकर्ता हिंजवडीचा सरपंच होतो तेव्हा….शिवनाथ दिगंबर जांभुळकर (पाटील) यांची हिंजवडीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड
मुळशीकरांकडून शुभेच्छांचा वर्षा,राष्ट्रवादी काँग्रेसचे महादेव कोंढरे व सुनील चांदेरे यांनी केले अभिनंदन

महावार्ता न्यूज ः हिंजवडीतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून माध्यमिक शाळेसाठी कुटूंबाने हालअपेष्टा सहन करत स्वतःचे राहते घर देण्याची दानशूरता दाखविणार्या शिवनाथ दिगंबर जांभुळकर (पाटील) यांची हिंजवडीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. मुळशीतून शंभूराजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ जांभुळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे महादेव कोंढरे व सुनील चांदेरे यांनीही अभिनंदन केले आहे.
ग्रामविकास श्री. म्हातोबा परिवर्तन पॅनेलच्या कोअर कमिटीमध्ये ठरल्यानुसार विशाल साखरे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी शिवनाथ जांभुळकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत नायकवडी यांनी केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर व गावकामगार तलाठी सागर शेलार यांनी सभेचे कामकाज पाहिले.
नवनिर्वाचित सरपंचाना शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे, मुळशीचे युवा नेते सुरेश हुलावळे, माजी सरपंच मल्हारी साखरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संतोष साखरे,माजी सरपंच तानाजी हुलावळे, शामराव हुलावळे,तानाजी हुलावळे,दिलीप हुलावळे, ऍड. शिवाजी जांभुळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड झाल्यानंतर शिवनाथ जांभुळकर व उपसरपंच शुभांगी साखरे यांचा हार व पुष्पगुच्छ देऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य, कोअर कमिटी पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नागरी सत्कार केला.यावेळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच गणेश जांभुळकर, विक्रम साखरे, विशाल साखरे,सचिन जांभुळकर,मचिंद्र हुलावळे,प्रदीप वाघमारे, मनीषा हुलावळे, रेखा साखरे, प्रतीक्षा जांभुळकर, शिवानी जांभुळकर दीपाली जांभुळकर पल्लवी गंगावणे, ऐश्वर्या वाघमारे आदी उपस्थित होते.
शिवनाथ हे मागील पंचवार्षिक मध्ये देखील ग्रामपंचायत चे सदस्य राहिले आहेत त्यामुळे त्यांचा ग्रामपंचायत मधील अनुभवाचा फायदा प्रलंबित विकास कामांच्या सोडवणुकीसाठी नक्की होईल यांच्या रूपाने हिंजवडी गावाला एक तरुण आणि विकासकामांचा पाठपुरावा करणारा सरपंच मिळाला आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सरपंच हिंजवडीचा कचरा व पिण्याच्या पाणी प्रश्नासह, कोरोनामुळे बंद पडलेले आयटी पार्क पूर्ववत करण्यासाठी निश्चित पुढाकार घेतील असा विश्वास कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
Share