
महावार्ता न्यूज ः राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर NHAI व टोलनाका प्रशासन स्थानिक नागरिकांकडून पुन्हा जबरदस्तीने टोलवसूली करत असल्याने टोलनाका हटवा मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सागर साखरे यांनी केली आहे.
त्यासंदर्भात NHAI चे स्थानिक प्रकल्प संचालक(Project Director) कदम यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने निवेदन देण्यात आले. टोल नाका PMRDA हद्दीच्या बाहेर हलविण्यात यावा तसेच तो हटेपर्यंत स्थानिक सर्व प्रकारच्या वाहनांना सरसकट टोलमधून सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली..
याप्रसंगी मा.सागर साखरे(अध्यक्ष, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस),मा.गणेश खुटवड(अध्यक्ष, भोर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस),मा.स्वप्निल कोंडे(मा.अध्यक्ष, बारामती लोकसभा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस),मा.मयूर साखरे(सदस्य.ग्रा.पं.स.हिंजवडी व उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मुळशी तालुका ), मा.प्रदीप मालुसरे(उपाध्यक्ष, भोर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस),मा.ओंकार कोंडे(उपाध्यक्ष, भोर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस),मा.श्रीकांत साखरे, मा.विकी साखरे उपस्थित होते..
Share