क्राइम
Trending
पिरंगुट घाटात भीषण अपघात, कंटेनरने 2 जणांना चिरडले, 3 जखमी, रोडवेज ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा – संतप्त मुळशीकरांची मागणी

महावार्ता न्यूज : मुळशीतील रस्ता रूदीकरणाच्या दिरंगाईमुळे सलग दुसरा दिवस रक्तरंजित ठरला असून मंगळवारी पिरंगुट घाटात कंटेनरने 3 दुचाकी वाहनांना भीषण धडक दिली. यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत.
सोमवारी भूगाव येथील अर्धवट रस्ता रुंदीकरण कामामुळे निष्पाप दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला होता. मंगळवार पिरंगुट घाटात पुन्हा बळी गेल्याने संतप्त झालेल्या मुळशीकरांनी ठेकेदार रोडवेज कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Share