खेळ खेळाडू
Trending

मुळशीत रविवारी कुस्तीचा डंका, महाराष्ट्र केसरी बाला रफिक स्पर्धेचे आकर्षण, मुळशीतून महाराष्ट्र केसरी विजेते निर्माण होण्यासाठी स्पर्धेचे संयोजन ः राजेंद्र बांदल

महावार्ता न्यूज ः कुस्ती क्षेत्रामध्ये मानाची समजली जाणारी मुळशी केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा या ठिकाणी रविवारी 3 एप्रिल रोजी करण्यात आलेले आहे.स्पर्धेचे हे विक्रमी सोळावे वर्ष आहे. या स्पर्धेमुळे कुस्ती शौकिनांना जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर मोठी स्पर्धा पहावयास मिळणार असल्याचे मत यावेळी मुळशी केसरी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले
मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या संयोजन कमिटी च्या वतीने नुकतेच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा 57 किलो,61 किलो,65 किलो,70 किलो,74 किलो व खुला गट अशा वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये खेळविण्यात येणार आहे.तरी या स्पर्धेमध्ये प्रत्येक गटामध्ये एकूण चार क्रमांक काढले जाणार असल्याची माहिती देखील संयोजन कमिटीच्या वतीने देण्यात आलेली आहे.
तालुक्यात मल्लविद्येची मोठी परंपरा असून मुळशीतून महाराष्ट्र केसरी विजेते निर्माण होण्यासाठी स्पर्धेचे संयोजन करीत असल्याचे स्पर्धेचे संयोजक राजेंद्र बांदल यांनी महावार्ताशी बोलताना सांगितले.
या स्पर्धेमध्ये “अमृता किताब चषक” ची कुस्ती ही नामांकित मल्ल महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख व मुंबई महापौर केसरी भारत मदने या दोन मल्लांमध्ये होणार आहे.विजेत्या सर्व मल्लांना आकर्षक चषक व भरघोस रक्कम दिली जाणार असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे.
याच बरोबर तालुक्यातील नामांकित व कार्यशील निवडक व्यक्तींना मुळशी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तर या स्पर्धेचे आयोजन मुळशी केसरी प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर मोहोळ,अध्यक्ष बाळासाहेब आमले,कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल,संयोजक शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
होत आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close