खेळ खेळाडू
Trending
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजचा राजेंद्र बांदल यांच्या घरी गौरव, रोख रक्कम देऊन केला पुण्यातील पहिला सन्मान

महावार्ता न्यूज ः महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून पुण्यात आल्यानंतर पेरिविंकल स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी त्याच्यासह राष्ट्रीय कुस्तीगीर सोनबा गोगांणे व प्रशिक्षक अमर निंबाळकर यांचा विशेष गौरव केला.
राजेंद्र बांदल यांच्या बावधन येथील राजभवन बंगल्यातील अपौचारिक कार्यक्रमात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता सोनबा गोगांणे व प्रशिक्षक अमर निंबाळकर यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरवित करण्यात आले. पाटील व गोंगाणे यांना राजेंद्र बांदल यांच्याकडून रोख रक्कम बक्षिस देण्यात आली. पृथ्वीराजचे चुलते संग्राम पाटील, बंधू राज पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. पुण्यात पृथ्वीराजचा रोख रक्कम देऊन सर्वात पहिला सत्कार करण्याचा मान बांदल यांना मिळाला आहे. याप्रसंगी लेखक व पत्रकार संजय दुधाणे, पेरिविंकल स्कूलच्या संचालिका रेखा बांदल, युवा उद्योजक यश बांदल, अमित बांदल, योगेश सोनावणे, दिपक कंधारे, प्रदिप साठे, रविंद्र चौधरी, गुरू कामशेट्टी, किरण कुडपणे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांचा गुलाबजाम आवडत असल्याने सौ. रेखा बांदल यांनी त्यांना गुलामजाम भरवून कौतुक केले. आपल्या प्रेमाने मी भारावून गेलेा आहे असे सांगून महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील म्हणाली की कुस्तीशौकिनांच्या या आपुलकीमुळेच महाराष्ट्रातील कुस्ती जिवंत आहे. राजेंद्र बांदल यांनी पृथ्वीराजचे अभिनंदन करून म्हणाले की, युवराज पाटीलनंतर कमी वयात पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी चॅम्पियन झाल्याचे मी पहात आहे. त्याने येणार्या आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेत आता देशाची शान उंचावावी. यावेळी संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तकाच्या 15 व्या आवृत्तीचे प्रकाशन पृथ्वीराज पाटीलच्या हस्ते करण्यात आले.
Share