माय मुळशी
Trending
लवळेमध्ये शुक्रवारी विविध विकास कामांच्या लोकार्पण – भूमिपूजन, आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख, आयुष प्रसाद यांची उपस्थिती

महावार्ता न्यूज: लवळे ता.मुळशी जि.पुणे येथील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट व फ्लेम विद्यापीठ यांचे विकास निधी व फिक्की फ्लो यांच्या सौजन्याने लवळे गावी शुक्रवारी २२ एप्रिल रोजी विकास कामांचा लोकार्पण व भूमीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. आयुष प्रसाद, पुणे उपवनसंरक्षक, पुणे विभाग राहुल पाटील यांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे
1. ग्रामपंचायत करिता कचरा गाडी (घंटागाडी) चे लोकार्पण.2. जिल्हा परिषद प्राथ. शाळा लवळे येथील १४ वर्गांसाठी ३०० बेंचेस,संगणक कक्ष चे लोकार्पण.
3. पृथ्वी दिना निमित्त वृक्ष लागवड,
4. महिलांसाठी – कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांचे भूमिपूजन. 5. स्मशानभूमी – रस्ता,शेड,संरक्षक भिंत या विकास कामांचे भूमिपूजन.
6. माझी वसुंधरा अंतर्गत लिहीलेली घोषवाक्ये व रंगविलेल्या भित्ती चित्रांचे लोकार्पण करणे.
7. महिला बचतगटा करिता बँकेचे पासबुक व साहित्य वितरण समारंभ
या कार्यक्रमास ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट अध्यक्ष अनिरुध्द सेवलेकर, फिक्की फ्लो, पुणे अध्यक्षा
सौ.निलम सेवलेकर, मा.श्री.राहुल मोरे, मा.श्री.शंकरराव सातव, मा.श्री.नाथाजी राऊत, मा.श्री.निलेश गावडे उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी सरपंच संजय सातव यांनी दिली.
Share