पुणे
Trending

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी मुळशीचा बळी – डॉ. सदानंद मोरे, मुळशी सत्त्याग्रह पुस्तकाचे 100 वर्षानंतर पुनर्प्रकाशन

महावार्ता न्यूज: महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती मिळावी यासाठी मुळशीचा बळी दिला गेला म्हणूनच महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती झाली. सदसदविवेकबुद्धी जागृत असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीकाने मुळशीकरांच्या प्रती कृतज्ञ राहून त्यांना मदत करायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. मुळशी सत्याग्रहाचे प्रणेते विनायक भुस्कुटे लिखित “मुळशी सत्याग्रह” या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन १ मे रोजी डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मुळशी धरण परिसरात झाले. यावेळी पर्यावरण अभ्यासक श्रीपाद धर्माधिकारी, लेखिका नंदिनी ओझा, प्रकाशक अनिल पवार, विनायक भुस्कुटेंचे नातू विद्याधर भुस्कुटे व नात सून वृंदा भुस्कुटे ,मुळशी सत्याग्रहाचे अभ्यासक बबन मिंडे हे प्रमुख मान्यवर आणि शेकडो मुळशी धरणग्रस्त उपस्थित होते.

ऐतिहासिक मुळशी सत्याग्रह पर्वाला सन २०२१ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या सत्याग्रहाचे स्मरण म्हणून “मुळशी सत्याग्रह” या नावाने सत्याग्रह प्रणेते विनायक भुस्कुटे यांनी १९४१ साली नाशिक जेलमधे असताना लिहीलेले पुस्तक सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे पुनर्प्रकाशित झाले.

यावेळी बोलताना डॅा. सदानंद मोरे म्हणाले, ” महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या पायामधे मुळशीचा बळी दिला गेला म्हणूनच महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती झाली. सदसदविवेकबुद्धी जागृत असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीकाने मुळशीकरांच्या प्रती कृतज्ञ राहून त्यांना मदत करायला हवी.”
लेखिका नंदिनी ओझा म्हणाल्या, “आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मुळशीचा लढा आणि हा परिसर एक तिर्थक्षेत्रच आहे कारण या लढ्यातून मार्गदर्शन घेत आम्ही नर्मदेचा लढा लढू शकलो होतो.”
देशाच्या विकासासाठी जे प्रकल्प उभारले जातात त्याच्या लाभावर पहिला अधिकार हा विस्थापितांचा असतो हेच या पुस्तकातून पहायला मिळते असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक श्रीपाद धर्माधिकारी यांनी केले.
मुळशी सत्याग्रहाच्या शताब्दीला सरकार व टाटा कंपनीने मुळशी धरणग्रस्तांना ते रहात असलेले घर त्यांच्या नावावर करून देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांना त्यांचा मुलभूत हक्क द्यावा अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या पुस्तकाचे प्रकाशक अनिल पवार यांनी या प्रसंगी केली. दिग्विजय जेधे, महेश मालुसरे , राजेश सातपुते,मंदार मते, चेतन कोळी,जिंदा सांडभोर ,मारूती गोळे,निलेश शेंडे, उमेश वैद्य ,विवेक देशमुख, सुभाष वाघ, हर्षद राव, हरिष गवई या सह्याद्री प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.
या प्रसंगी श्री शरदराव ढमाले (मा आमदार), श्री शांतारामदादा इंगवले (मा गट नेते जि प) , श्री रविंद्र उर्फ बाबा कंधारे(मा सभापती),
सौ.कोमलताई वाशिवले (मा सभापती) , श्री रामभाऊ ठोंबरे(जेष्ठ नेते) , श्री कालिदास गोपाळघरे (संचालक कात्रज दुधसंघ) श्री चंद्रकांत भिंगारे (संचालक कात्रज दुधसंघ), मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, शिवसेनाप्रमुख युवा नेते अविनाश बलकवडे,भाजपचे तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे ,मुळशी धरण विभाग विकास मंडळाचे अध्यक्ष गणपत वाशिवले ,श्री नंदू वाळंज,श्री अंकुश वाशिवले(मा सरपंच बार्पे)सौ अर्चना वाघ (सरपंच वाघवाडी) , श्री प्रकाश वाघ (उपसरपंच वाघवाडी), सौ स्वातीताई वाशिवले (सरपंच बार्पे), श्री एकनाथ दिघे ( मा सरपंच भांबर्डे)श्री श्रीकांत कदम (नेते आर पी आय मुळशी )राम गायकवाड, जेष्ठ पत्रकार धोंडीबा कुंभार , शरद शेंडे , पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी मान्यवर व मोठ्या संख्येने मुळशी धरणग्रस्त उपस्थित होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close