
पुणे : महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स म असोसिएशनच्या 55 व्या महाराष्ट्र राज्य आर्टीस्टीक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या शताक्षी टक्के वैयक्तिक सुवर्ण व सांघिक रौप्य पदकाची कमाई केली आहे.
पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल संपलेल्या राज्य आर्टीस्टीक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुलींच्या गटात शताक्षी टक्के हीने अनइवन बारमध्ये सुवर्णपदक जिंकले. शताक्षी टक्केने प्रज्ञा धमाळ, देवयानी कोलते, सुहानी आडने, गार्गी मोहोळे, कार्तिकी हेकडे आणि खुशी बारवाल यांच्या साथीने सांघिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे हरियाणातील राष्ट्रीय स्पर्धेत तिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
शताक्षी टक्के ही मुक्तांगण इंग्लिश स्कूल पुणे येथील साई संकुलात एलोरा मंगला यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. पवन भांबुरे, प्रांजल वर्मा, हर्षद मोघे आणि कु. रुचा दिवेकर यांचे तिला सहकार्य असून ह्या स्पर्धेसाठी शताक्षी हीला साईचे जिम्नॅस्टिक प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे मार्गदर्शन लाभले आहे. मुक्तांगण इंग्लिश स्कूल येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया जिम्नॅस्टिक सेंटरला पुणे विद्यार्थी गृह एज्युकेशन सोसायटीचे पूर्ण सहकार्य असून शाळेतील जिम्नॅस्टिक्सच्या विकासासाठी मुख्याध्यापिका मीना राणे मुक्तांगण इंग्लिश स्कूल यांनी विशेष लक्ष दिले असून त्यांनी सर्व विजेत्यांचे विशेष अभिनंदन केले.
Share