मुळशी पॅटर्नचा भूगावमध्ये रिटेक, जमिनीच्या वादातून चुलत भावाचा कोयत्याने गोठ्यात खुन, 3 जणांवर गुन्हा दाखल

महावार्ता न्यूज: बहुचर्चित मुळशी पॅटर्न चित्रपटाची आठवण करून देणारी घटना अनेक दिवसांनंतर मुळशीत घडली असून भूगावमध्ये जमिनीच्या वादातून 25 वर्षीय प्रितम फाळकेचा कोयत्याने निघृण खून करण्यात आला आहे. पौड पोलिसांनी 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पौड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भुगाव ता.मुळशी गावचे हददीत स्वॉगबर्ड सोसायटीचे वरील बाजुस फोर सिझन पासुन पुढे जाणारे रोडला गुंडा उर्फ अमित फाळके याच्या गोठयावर फिर्यादी ऋतुराज जाधव हे कामगारांना घेवुन गेलो असता कामगारांना गोठयाचे गेटवर थांबवुन, पुढे जावुन लाईटचे बल्बचे उजेडात गोठयाचे शेडचे आत असलेल्या खोलीचे पाहिले असता दारात रक्ताचे थारोळे तसेच रक्ताने माखलेला मोठा दगड,व काळया रंगाचे जर्कीग त्या शेजारी लोखंडी कोयता पडलेला दिसला.काळया रंगाचे जर्कीगला रक्त लागलेले दिसत असुन सदर जर्कीग हे प्रितम फाळके याचेच असल्याचे फिर्यादीने ओळखले. आरोपी 1) चेतन उर्फ पांडया रोहिदास फाळके, 2) अमीत उर्फ गुंडया चंद्रकांत फाळके, दोघे रा. स्वॉगबर्ड सोसायटी भुगाव ता. मुळशी व त्यांचा मित्र 3) शंकर, पुर्ण नाव पत्ता माहित नाही हे तेथुन पळुन जाताना फिर्यादीने पाहिले.
प्रितम फाळके याचे सोबत असलेल्या जमीनीचे वादातुन व रोजचे भांडणावरून संगनमत करून प्रितम राजेंद्र फाळके वय 25 वर्षे रा. स्वॉगबर्ड सोसायटी भुगाव ता. मुळशी याचे डोक्यात दगडाने मारहाण व कोयत्याने गंभीर वार करून त्याचा खुनाचा गुन्हा पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ करीत आहे