राजकीय
Trending

साईड न दिल्याच्या कारणावरून मुळशीत  बेदम मारहाण, दुचाकीस्वाराचा खुन, 3 जणांना अटक

महावार्ता न्यूज: पुणे लवासा रस्त्यावर एका दुचाकीला साईड न दिल्याच्या कारणावरून दुसऱ्या एका दुचाकीवरील तिघांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सदर घटना ८ मे रोजी आंदगाव ता. मुळशी येथे घडली असून सुभाष विठ्ठल वाघमारे वय ३८ वर्षे रा. तुंगी,ता. मावळ जि.पुणे असे मयताचे नाव आहे. याबाबत मयताचा मावस भाऊ राजेश अंकुश कुवर यांनी पौड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल करून पौड पोलीसांनी राजेंद्र जगन्नाथ मोहोळ -वय 50, संग्राम सुरेश मोहोळ वय 21, समीर दिपक करपे वय 23 सर्व रहाणार मुठा यांना अटक केलयाची माहिती पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.
उरवडे ते लवासा रोडवरवर फिर्यादी व त्याचा मावस भाऊ सुभाष विठ्ठल वाघमारे वय 38 वर्षे रा. तुंगी,ता. मावळ जि.पुणे हे होंडा कंपनीची एक्स ब्लेड मोटार सायकल नं. एम.एच/14/एच.जे/8937 वरुन जात असताना पँशन मोटार सायकल नं एम.एच/14/बी.एच/8890 वरील अंदाजे 48 वर्षाचा अनोळखी इसम यांनी मोटार सायकलला साईड न देण्याचे कारणावरुन फिर्यादीचे मोटार सायकलचे चावी काढुन घेवुन पुढे जाण्यास अडथळा करुन त्याने व काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल नं.एम.एच/12/एच.डब्लु/4099 ही वरील अंदाजे 22 ते 23 वर्ष वयाचे दोन अनोळखी इसम नाव पत्ता माहीत नाही या तिघांनीही सुभाष विठ्ठल वाघमारे वय 38 वर्षे रा. तुंगी,ता. मावळ जि.पुणे यांस हाताने, लाथाबुक्याने मारहाण करुन जिवे ठार केले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोसई श्रीकांत जाधव हे करीत आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close