क्राइम
Trending
मुळशीतील मानस तलाव परिसर बनला तळीरामांचा अड्डा, अनेकांचा बुडून मृत्यूनंतरही प्रशासन झोपलेले

महावार्ता न्यूज ः भुगाव भुकुम च्या हद्दीमध्ये असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाच्या कडेने मोठ्या प्रमाणात फुकटे तळीराम येऊन दारू पिण्यास बसण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून वाढलेले आहेत.
त्यापैकी काही जणांनी स्वतःचा जीव सुद्धा या तलावांमध्ये गमावलेला असून तरीही सुस्त पाटबंधारे विभागाचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या परिसरामध्ये दिवाळीनंतर तलावाचे पाणी कमी होते आणि कमी झालेल्या पाण्याच्या परिसरामध्ये तळी रामांनी आपले अड्डे तयार केलेले आहेत. पाणी खाली गेल्यामुळे त्या ठिकाणी कोण बसलय कोण नाही हे काही समजत नाही त्यामुळे संध्याकाळी अंधार पडला की या ठिकाणी तळीरामांची मोठी गर्दी पाहायला झालेली मिळते अनेक वेळा पौड पोलिसांनी त्यांना हटकले परंतु अटक केल्यानंतर काही दिवस बंद होतात आणि परत पुन्हा बे एके बे त्यांचे सुरू होते या तलावाच्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात खच पडलेला असतो तसेच काचा पडलेल्या आहेत यामुळे पावसाळ्यामध्ये तलाव पूर्ण भरल्यानंतर पाण्यामध्ये उतरण्यास शेतकऱ्यांना अनेक वेळा पाय कापणे सारख्या इजा झालेल्या आहेत. या तळीरामावर ग्रामपंचायतींनी अत्यंत तातडीने ऍक्शन घेण्याची गरज आहे. त्याचे कारणही तसेच आहे या ठिकाणी ग्रामपंचायत हे करू शकते. तलावाला चारही बाजूंनी कुंपण घालण्याची आवश्यकता असून त्याठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे. या तलावाच्या तीनही बाजूंनी मोठ्या प्रमाणात हॉटेल इंडस्ट्री असून त्यापैकी तलावाच्या सुरुवातीलाच मानस रिसॉर्ट नावाचे एक बंद पडलेले हॉटेल असून त्यांनी अनधिकृतपणे तलावाच्या पाण्यात तसेच परिसरात लोखंडी पूल उभा करून त्याठिकाणी ते हुक्का पार्लर चालवायचे हॉटेल बंद पडल्यामुळे तो लोखंडी पूल आणि बोटिंग क्लब मधल्या बंद स्थितीत असलेल्या बोटी तशाच पडलेल्या आहेत अनेक पर्यटक या ठिकाणी धोकादायक पद्धतीने सेल्फी घेण्यासाठी तसेच पाण्यामध्ये उतरण्यासाठी याचा वापर करत आहेत या विषयावर अनेक वेळा आवाज उठविला परंतु गेंड्याच्या कातडीचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देतील तर खरे. याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे.
Share