
महावार्ता न्यूज: वाट चुकलेल्या चीतळ जातीच्या हरणाचा भुकूम परिसरातील स्काय आय स्टार टाउन सोसायटीच्या परिसरात असलेल्या राम नदी मध्ये मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जीवे मारले.
मुळशी तालुक्यात मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने नागरिकही त्रस्त आहेत.
परिसरातील नागरिक सकाळी चालण्यासाठी गेले असता राम नदीच्या परिसरात खूपच कुत्री भुंकत आहेत हे पाहून त्या ठिकाणी पाहिले असता या हरणाचा चावा हे मोकाट कुत्रे घेत होते नागरिकांनी कुत्र्यांना हाकलून दिले. राम नदी पात्राच्या गाळात मोकाट कुत्र्यांनी हल्ला केलेले चितळ जातीचे हरीण जखमी अवस्थेत रात्रीच्या वेळी अडकले होते. भूकूम च्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हरणे येत असतात परंतु परिसरात नागरीकरण वाढले आहे त्यामुळे याठिकाणी मोकाट कुत्री सुद्धा खूपच वाढलेली आहेत यापूर्वीसुद्धा या मोकाट कुत्र्यांचा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याच्या बातम्या अनेक वेळा प्रसिद्ध केलेले आहेत.
स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला असता टिम घटणास्थळी पोचली असता स्थानिक नागरिकांच्या साह्याने हरणाला चिखलातुन बाहेर काढण्यात आले जवळच राहत असलेले भुगाव येथिल रेक्सुव टिमचे डॉ. चेतन यांनी हरणावर प्राथमीक उपचार करायला घेतले असता त्याचा मृत्यू झालेला आहे असे त्यांनी सांगितले.वनविभागाच्या सारिका दराडे ,अधिकारी शेलार , मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे यांनी हरणाला रेक्सुव व्हॉनमधे ठेऊन पुढील कार्यवाही साठी भुगाव येथे पाठवण्यात आले .
Share